Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीची हत्या, नंतर पतीने Google वर सर्च केलं, “बायकोच्या मृत्यूनंतर किती दिवसात पुन्हा लग्न करता येईल?”

पत्नी बेपत्ता झाल्यानंतर पतीकडून गुगलवर, "बायकोच्या मृत्यूनंतर किती दिवस पुन्हा लग्न करता येईल?" असं सर्च करण्यात आलं होतं. या सर्चिंगनंतर पोलिसांकडून पतीला अटक करण्यात आली. नेमकं प्रकरण काय आहे?

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 04, 2024 | 05:36 PM
पत्नीची हत्या, नंतर पतीने Google वर सर्च केलं, "बायकोच्या मृत्यूनंतर किती दिवसात पुन्हा लग्न करता येईल?" (फोटो सौजन्य-X)

पत्नीची हत्या, नंतर पतीने Google वर सर्च केलं, "बायकोच्या मृत्यूनंतर किती दिवसात पुन्हा लग्न करता येईल?" (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

इंटरनेट आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये एक अविभाज्य भाग बनला आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही शोधायचे असेल तर आपण गुगलची मदत घेतो. सोशल मीडिया ब्राऊजिंग असो किंवा काही डाऊनलोड करायचं असेल. गुगलवरून कोणत्याही प्रश्नाची उत्तरे शोधणं असो किंवा नोकरी शोधणे असो, इंटरनेट आज आपल्याला अनेक प्रकारे मदत करते. पण काहीजण या गुगलचा गैरफायदा देखील घेतात. अशी एक घटना समोर आली. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये नेपाळी वंशाच्या नरेश भट्ट याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रिन्स विल्यम काउंटी कोर्टाने नरेश भट्ट याच्यावर त्यांची पत्नी ममता काफले भट्ट यांच्या हत्येप्रकरणी आरोप दाखल करण्यात आले. कोर्टाच्या नोंदीनुसार नरेश भट्ट यांच्यावर मृतदेह लपवल्याचाही आरोप आहे.

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात राहणारे नेपाळी वंशाचे नरेश भट्ट याचे लग्न नेपाळी वंशाच्या ममता काफले भट्टसोबत झाले होते. जुलै 2024 मध्ये एके दिवशी ममता अचानक बेपत्ता झाली. नरेश यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला, मात्र बराच वेळ कोणताही सुगावा लागला नाही.मग अचानक एके दिवशी तपास करणाऱ्या पोलिसांना महत्त्वाचा पुरावा लागला. पोलिसांना नरेशचा एका जुना गुगल सर्च सापडला ज्यावरुन त्यानेच गुन्हा केल्याचं उघड झालं.

गुगल सर्चद्वारे उघड झाले रहस्य

ममताच्या हत्येचं गूढ उकलणाऱ्या टीमला नरेशवर संशय आला. त्यामुळे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटपासून त्याच्या इमेल्सपर्यंत सर्व गोष्टींचा शोध घेण्यात आला. कुठेही काही सापडले नाही. पण नंतर नरेशची गुगल सर्च हिस्ट्री तपासली असता एका सर्चने पोलीस टीमला आश्चर्याचा धक्का बसला. नरेशने गुगल बाबाला विचारला प्रश्न पाहुन सर्वांना धक्का बसला. पत्ता होण्याच्या काही महिने आधी नरेशने गुगलवर, “बायकोच्या मृत्यूनंतर किती दिवस पुन्हा लग्न करता येईल?” असं सर्च केलं होतं.

बेकायदेशीर गोदामावर पोलिसांचा छापा, 7 लाखांचा गुटखा जप्त

हा सुगावा पोलिसांच्या संशयाचे विश्वासात रुपांतर करण्यास पुरेसा होता. नरेशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले. व्हर्जिनिया राज्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममताचा मृतदेह घराच्या आत होता.तो ओढून घराबाहेर काढण्यात आला होता. नरेशवर ममताचा मृतदेह लपवल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. या हत्येचा तपास करण्यासाठी अमेरिकन कोर्टाने ‘ग्रँड ज्युरी’ स्थापन केली होती. या ज्युरीने आता आरोपपत्रही सादर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे म्हणणे आहे की, हा आरोप त्यांच्या पत्नी ममता काफले भट्टच्या मृतदेहाचे तुकडे झाल्याचे दाखवणाऱ्या पुराव्याशी संबंधित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी होणार आहे.

काय प्रकरण आहे?

ममता भट्ट नावाची नेपाळी वंशाची महिला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बेपत्ता झाली होती. २९ जुलै रोजी त्यांचा फोन शेवटचा असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी ममताचे पती नरेश भट्ट यांची चौकशी केली. या चौकशीत नरेशने अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू केली. यावेळी नरेशने सांगितलेल्या अनेक गोष्टींवरून पोलिसांना संशय आला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने तपासासाठी एक पथक तयार केले.

पोलिसांकडे महत्त्वाचे पुरावे

पोलिसांनी सांगितले की, ‘भट यांच्या घराच्या मुख्य बेडरूममध्ये रक्ताचे डाग सापडले आहेत. कार्पेटवरही हलके डाग होते. बाथरुममध्येही बरेच रक्त दिसत होते.. काहीतरी ओढून नेल्यासारखं वाटत होतं. सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले की, त्यांच्याकडे काही रेकॉर्डिंग आहेत, ज्यामध्ये नरेश भट्ट अनेकदा रात्री कारमधून प्रवास करताना दिसतात. यामध्ये तो कचऱ्याच्या पिशवीत काहीतरी फेकताना दिसत आहे. ममता बेपत्ता झाल्यानंतर हे रेकॉर्डिंग करण्यात आल्याचा आरोप आहे.

नरेश भट्ट तुरुंगात

2 ऑगस्ट रोजी ममताच्या सहकाऱ्याने पोलिसांना कळवले की, ती 1 आणि 2 ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये येणार होती, पण आली नाही. ती फोनही उचलत नसल्याचे सहकाऱ्याने सांगितले. तपासासाठी पोलिसांचे पथक नरेश आणि ममताच्या घरी पोहोचले. मात्र नरेश भट्ट यांनी त्यावेळी बेपत्ता अहवाल लिहून घेण्यास नकार दिला. तीन दिवसांनंतर, त्याने ममता बेपत्ता झाल्याचा अहवाल लिहून घेतला आणि सांगितले की तो 31 जुलै रोजी रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर त्याच्या पत्नीला भेटला होता. पोलिसांनी घराची झडती घेतली आणि चौकशीनंतर 22 ऑगस्ट रोजी नरेश भट्टला अटक केली. सप्टेंबरमध्ये त्यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली, पण ती फेटाळण्यात आली.

ममता आणि नरेश भट्ट नक्की कोण आहेत?

नरेश आणि ममता दोघेही मूळचे नेपाळी असून ते अमेरिकेत राहत होते. 28 वर्षीय ममता यूव्हीए हेल्थ प्रिन्स विल्यम मेडिकल सेंटरमध्ये नर्स म्हणून काम करत होती. त्याच वेळी नरेश भट्ट हे यूएस आर्मीमध्ये राखीव स्वयंचलित लॉजिस्टिक विशेषज्ञ आहेत. जून 2017 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत त्यांनी काम केले. दोघांचेही सुमारे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांनाही एक वर्षाची मुलगी नीमा आहे. ममताचे कुटुंबीय नेपाळमधील कावरेपाल्चोक जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले. तर नरेशचे कुटुंब कांचनपूरचे आहे.

अवैधरित्या भारतात प्रवेश; पुणे आणि मुंबईतून तरूणी पोलिसांच्या ताब्यात

Web Title: Indian origin man indicted for wifes murder in us googled when he could remarry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 05:32 PM

Topics:  

  • America
  • Google Search

संबंधित बातम्या

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
1

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
2

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
3

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.