Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Flights : 530 उड्डाणे रद्द तर 430 विमानांना विलंब; FAA प्रमुखांनी मागितली प्रवाशांची माफी, जाणून घ्या कधी होणार सेवा पूर्व

US Flights : एफएएने अलीकडेच अमेरिकेत विमान उड्डाणे थांबवण्याचा आदेश जारी केला आहे. परिणामी, ५३० उड्डाणे रद्द झाली असून ४३० उड्डाणांना विलंब होत आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 15, 2026 | 10:58 AM
FAA Ground Stop Update November 2026 530 Flights Cancelled 430 Delayed America

FAA Ground Stop Update November 2026 530 Flights Cancelled 430 Delayed America

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकन हवाई वाहतुकीचा मोठा खोळंबा
  • ९/११ नंतरचा सर्वात मोठा निर्णय
  • सायबर हल्ला नाही, तर जुनी यंत्रणा कारणीभूत

जगातील सर्वात प्रगत आणि व्यस्त हवाई वाहतूक व्यवस्था असलेल्या अमेरिकेत (US Flights) सध्या प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अमेरिकेची विमान वाहतूक नियामक संस्था ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’ (FAA) च्या हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण देशातील हवाई प्रवास विस्कळीत झाला आहे. या बिघाडामुळे एफएएने तात्काळ देशभरातील विमान उड्डाणे थांबवण्याचा (Nationwide Ground Stop) आदेश जारी केला. याचा थेट फटका हजारो प्रवाशांना बसला असून, ताज्या आकडेवारीनुसार सुमारे ५३० उड्डाणे पूर्णपणे रद्द करावी लागली आहेत, तर ४३० उड्डाणांना मोठा विलंब होत आहे.

शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी या तांत्रिक बिघाडाचे गंभीर परिणाम अमेरिकेतील प्रमुख विमानतळांवर पाहायला मिळाले. अचानक विमाने रद्द झाल्याने आणि वेळापत्रक कोलमडल्याने विमानतळांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून हजारो प्रवासी सलग दोन दिवसांपासून विमानतळांवर अडकून पडले आहेत. सुट्ट्यांचे दिवस आणि महत्त्वाच्या कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

एफएए प्रमुखांनी मागितली माफी; रविवार संध्याकाळपर्यंत सेवा सुरळीत होण्याची आशा

प्रवाशांना होत असलेला प्रचंड मनस्ताप आणि गैरसोय लक्षात घेऊन एफएएचे प्रशासक ब्रायन बेडफोर्ड (Bryan Bedford) यांनी समोर येऊन सर्व प्रवाशांची जाहीर माफी मागितली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रवाशांना धीर दिला आणि सांगितले की, हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली आता पूर्णपणे स्थिर करण्यात आली आहे आणि एजन्सीचे तज्ज्ञ तंत्रज्ञ ही तांत्रिक समस्या मुळापासून सोडवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Fight Against Crime: सीमापार गुन्हेगारीचा भस्मासुर रोखण्यासाठी जागतिक एकजूट आवश्यक; जाणून घ्या 15 नोव्हेंबरचे महत्त्व

बेडफोर्ड यांनी असा विश्वास व्यक्त केला की, जर सर्व काही नियोजनानुसार आणि सुरळीत पार पडले, तर रविवार संध्याकाळपर्यंत संपूर्ण अमेरिकेतील हवाई सेवा बऱ्याच अंशी सामान्य होईल. मात्र, दोन दिवसांपासून विमाने जागच्या जागी थांबलेली असल्यामुळे आता सर्वच विमान कंपन्यांसमोर (Airlines) एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. विमानांची नव्याने मांडणी करणे, वैमानिक (Pilots) आणि केबिन क्रू यांच्या ड्युटीचे वेळापत्रक पुन्हा बसवणे या प्रक्रियेला काही तासांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या संबंधित एअरलाईनकडून विमानाची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

JUST IN 🚨: FAA issues nationwide ground stop https://t.co/AvMfZOmLuc — Barchart (@Barchart) November 13, 2026

credit – social media and Twitter

९/११ च्या हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा विमानबंदीचा आदेश

अमेरिकेच्या हवाई इतिहासात अशी घटना अत्यंत दुर्मिळ मानली जाते. अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी (Sean Duffy) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी जेव्हा दळणवळण यंत्रणेत बिघाड झाला, तेव्हा आकाशात सुमारे ३,५०० विमाने उड्डाण करत होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये म्हणून एफएएने असाधारण परिस्थिती लक्षात घेता देशभरात तात्काळ विमानबंदीचा आदेश जारी केला.

तज्ज्ञांच्या मते, ११ सप्टेंबर २००१ (९/११) रोजी अमेरिकेवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यांनंतरचा हा देशभरातील सर्वात मोठा आणि गंभीर विमानबंदीचा निर्णय आहे. केवळ सुरक्षेच्या कारणास्तव आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा कठीण निर्णय घ्यावा लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ayat Ul Kursi: करीना कपूरने घातलेल्या 200 वर्षे जुने राजेशाही पेंडंट ‘आयत-उल-कुर्सी’चा अर्थ काय? ज्यामुळे मिळाली कायदेशीर नोटीस

नेमके काय बिनसले?

इतक्या मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतूक ठप्प झाल्यानंतर सुरुवातीला अमेरिकेवर कोणता परकीय सायबर हल्ला झाला आहे का, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी आणि गृहसुरक्षा विभागाने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या घटनेमागे कोणत्याही प्रकारचा सायबर हल्ला किंवा घातपात नाही.

खरे कारण म्हणजे अमेरिकेच्या हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीचे अत्यंत जुने झालेले हार्डवेअर आणि कम्युनिकेशन उपकरणे. सध्या प्रणालीमध्ये जुन्या तांब्याच्या तारांऐवजी (Copper Wires) आधुनिक फायबर नेटवर्क बसवण्याचे काम सुरू आहे. याच दुरुस्तीच्या कामादरम्यान एका राउटरमध्ये बिघाड होऊन संपूर्ण नेटवर्कवर प्रचंड ‘डेटा ओव्हरलोड’ झाला आणि दळणवळण यंत्रणा कोलमडली. वाहतूक सचिवांनी असेही नमूद केले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेल्या वर्षभरापासून या जुन्या हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीच्या संपूर्ण आधुनिकीकरणासाठी निधीला मंजुरी देण्याकरिता अमेरिकन काँग्रेसकडे सातत्याने आग्रह धरत आहेत. या घटनेमुळे आता तरी अमेरिकन संसद या आधुनिक प्रकल्पासाठी तातडीने निधी मंजूर करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेत ५३० हून अधिक विमान उड्डाणे का रद्द करण्यात आली?

    Ans: अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) च्या हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीमध्ये जुने हार्डवेअर आणि डेटा ओव्हरलोडमुळे तांत्रिक बिघाड झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव देशभरात उड्डाणे थांबवण्यात आली.

  • Que: अमेरिकेतील ही विमानबंदी सायबर हल्ल्यामुळे झाली आहे का?

    Ans: नाही, अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी आणि एफएए प्रमुखांनी स्पष्ट केले आहे की हा कोणताही सायबर हल्ला नसून, कॉपर ते फायबर नेटवर्क अपग्रेड करताना झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली आहे.

  • Que: अमेरिकेतील हवाई वाहतूक सेवा केव्हा पूर्ववत होईल?

    Ans: एफएए प्रशासक ब्रायन बेडफोर्ड यांच्या मते, तांत्रिक प्रणाली आता स्थिर झाली असून रविवार संध्याकाळपर्यंत संपूर्ण अमेरिकेतील विमानसेवा बऱ्याच अंशी सामान्य होईल.

Web Title: Us flights cancelled delayed faa ground stop technical glitch apology hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • America
  • Flights
  • World news

संबंधित बातम्या

US Aviation Crisis : विमान वाहतूक व्यवस्था कोलमडली; हजारो उड्डाणे रद्द, प्रवाशांचे विमानतळांवर हाल
1

US Aviation Crisis : विमान वाहतूक व्यवस्था कोलमडली; हजारो उड्डाणे रद्द, प्रवाशांचे विमानतळांवर हाल

India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार अंतिम? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती
2

India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार अंतिम? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला
3

Russia Ukraine War : रशियाच्या शांततेच्या अटी कायम; युक्रेन आक्रमक,पाश्चात्य देशांचा दृष्टिकोन मात्र बदलला

Nvidia : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले टेक जगताचे बादशहा; गुप्तचर यंत्रणांचा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी जेन्सन हुआंगला का वाचवले?
4

Nvidia : ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले टेक जगताचे बादशहा; गुप्तचर यंत्रणांचा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी जेन्सन हुआंगला का वाचवले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.