
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
पोलिसांनी आरोपींना जालना जवळील टोलनाक्यावरुन ताब्यात घेतले. व्यावसायिक हत्या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कमलेश झाडीवाले आणि कल्याण भोजने यांना अटक केली. आरोपी कल्याण भोजने आणि मृतक सागर यांच्यात पैश्यांचा व्यवहार होता, याच व्यवहारातून आरोपी कल्याण भोजने याने कमलेश झाडीवाले याला हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपी कल्याण भोजने याच्या सांगण्यावरून आरोपी कमलेश झाडीवाले याने शहरातील आंबड चौफुली परिसरामध्ये मृतकवर गोळीबार केला. आरोपीने मृतकाच्या आधी बोलण्यात गुंतवले नंतर त्याच्यामानेवरती पिस्टलमधून दोन राउंड फायर केले. तसेच धारधार शस्त्राने त्याच्यावरती वार करत त्याची हत्या केली.
दुसऱ्यादिवशी रविवारी सकाळी पोलिसांना कारमध्ये मृतदेह आढळला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झाले आणि ड्रायव्हर सीटजवळ पिस्टलसह दोन मोबाईल पोलिसांच्या हाती लागले. गाडीतील आणि शस्त्रावरील ठसे, पुरावे बारकाईने जतन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली तेव्हा एक महत्वाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आरोपी कमलेश
झाडीवाले मयताच्या कारमधून उतरताना स्पष्टपणे दिसत होता. हा दृश्य पुरावा मिळताच आत्महत्येचा हा बनाव असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि तपासाला वेग आला.
एवढेच नाही तर, आरोपीने चलाखी दाखवत हत्येच्या दुसऱ्याच दिवशी मृतकाच्या नातेवाईकांसोबत पोस्टमार्टमसाठी संभाजीनगर गाठलं. आपण संशयाच्या भोवऱ्यात येणार नाही, असा त्याचा अंदाज होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या त्याची सगळी पोलखोल केली. पोलिसांनी त्याचा मार्ग घेत संभाजीनगरहून परततांना जालना जवळील टोलनाक्यावर त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस चौकशीत आरोपीने अखेर गुपित उघड केलं आणि सहआरोपी कल्याण भोजने याचं नाव पुढे आलं. तांत्रिक विश्लेषण आणि ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पोलीस पुढील तपास करत आहे.
Mumbai Crime: दिव्यांग महिलेवर लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल; आधी नशेचे पदार्थ मिसळून खायला दिल नंतर…
Ans: जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली.
Ans: पैशाच्या व्यवहारातून वाद निर्माण झाला आणि त्यातून सुपारी देऊन हत्या करण्यात आली.
Ans: CCTV फुटेज, फॉरेन्सिक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी हत्या उघड केली.