Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! दारूबंदीच्या जावळीत उत्पादन शुल्क विभागानेच पकडली दारू; एकाच दिवशी आठ ठिकाणी कारवाई

ज्या जावळी तालुक्याची ओळखच दारूबंदीच्या प्रयोगामुळे झाली, त्याच तालुक्यात अवैध मद्यविक्री सुरू असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या रवाईतून समोर आले आहे. एकाच दिवशी आठ ठिकाणी छापे टाकून देशी-विदेशी दारू आणि बिअरसह २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 23, 2026 | 02:45 PM
अबब! दारूबंदीच्या जावळीत उत्पादन शुल्क विभागानेच पकडली दारू; एकाच दिवशी आठ ठिकाणी कारवाई

अबब! दारूबंदीच्या जावळीत उत्पादन शुल्क विभागानेच पकडली दारू; एकाच दिवशी आठ ठिकाणी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • जावळीत आठ ठिकाणी दारू जप्त
  • आठ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल
  • २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
 

मेढा : राज्यात दारूबंदीच्या प्रयोगासाठी ओळखल्या जाणाऱ्या जावळी तालुक्यात अवैध मद्यविक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने २१ सप्टेंबर रोजी तालुक्यातील विविध गावांमध्ये अचानक छापे टाकत आठ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत देशी-विदेशी दारू आणि बिअरसह एकूण २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दारूबंदी असतानाही दारू विक्री सुरू

संपूर्ण जावळी तालुक्यात दारूबंदी असतानाही काही भागांत अवैधपणे दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. या कारवाईमुळे दारूबंदीच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. अवैध मद्यविक्री रोखण्याची जबाबदारी पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाची असताना, दोन्ही विभागांमधील समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा: Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

महिलांच्या आंदोलनातून झाली होती दारूबंदी

जावळी तालुका दारूमुक्त करण्यासाठी काही वर्षांपूर्वी महिलांनी मोठी चळवळ उभारली होती. त्यामुळे जावळीची दारूबंदी ही केवळ प्रशासकीय निर्णय न राहता सामाजिक चळवळीचा विषय बनली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात चोरून दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

आठ गावांत कारवाई

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत बिभवी, मेढा, सोमर्डी, करहर, सोनगाव आणि आनेवाडी या भागांत दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला :

  • बिभवी : आकाश आगलावे — ५ हजार ४८० रुपयांची देशी दारू/बिअर
  • मेढा : मयुरेश गोरे — ४ हजार २०० रुपयांची देशी दारू
  • मेढा : गणेश विष्णू धनावडे — २ हजार ८०० रुपयांची देशी दारू
  • सोमर्डी : निरंजन साहेबराव परामणे — २ हजार ४०० रुपयांची देशी दारू
  • करहर : दिपाली रमेश गोळे — ५ हजार ३४० रुपयांची देशी/विदेशी दारू
  • करहर : संभाजी रामचंद्र गोळे — ३ हजार ३६० रुपयांची देशी दारू
  • सोनगाव : दिपक संजय शेवते — २ हजार ८० रुपयांची देशी दारू
  • आनेवाडी : अनिल मुगुटराव फरांदे — ३ हजार ८४० रुपयांची देशी दारू
या कारवाईत एकूण २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा: Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा

उत्पादन शुल्क विभाग अचानक सक्रिय का?

जावळी तालुक्यातील अवैध मद्यविक्रीकडे उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांनी विशेष लक्ष दिल्यानंतर विभागाची कारवाई वेगाने सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी अवैध मद्यविक्रीच्या कारवाईवरून पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग यांच्यात जबाबदारी ढकलली जात असल्याची चर्चा होती. मात्र, आता उत्पादन शुल्क विभागाने एकाच दिवशी आठ ठिकाणी केलेल्या कारवाईमुळे दारूबंदीच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

अवैध व्यवसाय ज्या हद्दीत आढळतील, त्या भागातील संबंधित बिट अंमलदारांवर कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून यापूर्वी देण्यात आले होते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने ज्या भागांत अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई केली, त्या हद्दीतील संबंधित बिट अंमलदारांवर पोलीस अधीक्षक पिंगळे कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता याबाबत पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे जावळीकरांचे लक्ष लागले आहे.

चौकट

आठ ठिकाणी कारवाई; २९,५०० रुपयांचा मुद्देमाल

बिभवी, मेढा, सोमर्डी, करहर, सोनगाव आणि आनेवाडी परिसरात कारवाई करून आठ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. देशी-विदेशी दारू आणि बिअरसह २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Jawali darubandi illegal liquor sale excise action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • illegal liquor
  • Satara News

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला आता वेग; 21 जागांसाठी 2019 मतदार, इच्छुकांची धावपळ
1

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला आता वेग; 21 जागांसाठी 2019 मतदार, इच्छुकांची धावपळ

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल
2

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
4

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.