Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : पाच हजारांची अग्रिम मदत अंतिम नाही; पंचनाम्यानंतर निकषांनुसार पूर्ण मदत देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News : साताऱ्यातील माण तालुक्यातील पिंपरी गावात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी फराळ केला. पाच हजार रुपयांची अग्रिम मदत अंतिम नसून, पंचनाम्यानंतर शासनाच्या निकषांनुसार पूर्ण मदत देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 08, 2026 | 09:36 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पाच हजारांची मदत ही अंतिम नाही
  • शेतकऱ्यांसोबत बांधावरच दिवाळी फराळ
  • सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम
Satara News : दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा सण! मात्र निसर्गाच्या अवकृपेने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात यंदा या सणाचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट शेताच्या बांधावरच दिवाळी साजरी केली. पाच हजार रुपयांची अग्रिम मदत ही अंतिम नसून, पंचनाम्यानंतर शासनाच्या निकषांनुसार पूर्ण मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाच हजारांची मदत ही अंतिम नाही

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीबाबत बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पाच हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, त्यांना सणाच्या काळात काहीसा दिलासा मिळावा, या उद्देशाने देण्यात येत आहे. ही अंतिम मदत नाही. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे अहवाल प्राप्त होतील. त्यानंतर शासनाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना पूर्ण मदत देण्यात येईल.

Mumbai News : शिवाजी पार्कमध्ये दिवाळी पहाट रंगली! 10 हजारांहून अधिक रसिकांची उपस्थिती; दुष्काळग्रस्तांसाठी 2.15 कोटींची मदत

शेतकऱ्यांसोबत बांधावरच दिवाळी फराळ

माण तालुक्यातील पिंपरी गावात आज एक आगळेवेगळे आणि माणुसकीचा संदेश देणारे चित्र पाहायला मिळाले. कोणताही औपचारिक मंच नाही, मानपानाचा बडेजाव नाही, तर शेतातील मातीवर अंथरलेल्या घोंगड्यावर पालकमंत्री शेतकऱ्यांसोबत बसले होते. सोबतीला गावातील शेतकरी, समोर दिवाळीचा फराळ आणि मनमोकळा संवाद! निमित्त होते दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्यासाठी आयोजित केलेल्या फराळाच्या कार्यक्रमाचे.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकट कितीही मोठे असले तरी खचून जाऊ नका, धीर सोडू नका, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. आपणही यंदा साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली असून, संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहणे हीच खरी आपुलकी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Mangal Prabhat Lodha : आरेतील आदिवासींसोबत मंगलप्रभात लोढांनी साजरी केली दिवाळी; फराळ वाटप करत घेतला, तारपा नृत्याचा आनंद

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम

‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,’ असा विश्वास देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या संकटामुळे खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांच्या घरात पुन्हा सुखाचे दीप उजळावेत, त्यांच्या कष्टांना दिलासा मिळावा आणि संकटाशी सामना करण्यासाठी त्यांना नवे बळ मिळावे, या भावनेतून झालेला हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी केवळ सणाचा सोहळा नव्हता, तर संकटाच्या काळात आपण एकटे नाही, आपल्या पाठीशी कोणीतरी उभे आहे, ही जाणीव करून देणारा क्षण होता.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, शेखर गोरे यांच्यासह पिंपरी गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळीच्या प्रकाशात आशेचा नवा किरण! संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत फराळाचा घास घेणे, त्यांच्या व्यथा ऐकणे आणि मदतीचा विश्वास देणे, या कृतीतून यंदाच्या दिवाळीत माणुसकीच्या नात्याचा दिवा अधिक तेजाने उजळल्याचे चित्र पिंपरी गावात पाहायला मिळाले.

Web Title: Satara news shambhuraj desai farmers 5000 advance relief diwali support cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Marathi News
  • Satara News
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Israel News :नेतान्याहूंच्या सत्तेला मोठे आव्हान; राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांच्याकडून,आयझेनकोट यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण
1

Israel News :नेतान्याहूंच्या सत्तेला मोठे आव्हान; राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांच्याकडून,आयझेनकोट यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण

Saudi Arebia News : सौदी अरेबियाच्या आर्थिक केंद्रावर हल्ला ? अरामको टॉवरचे नुकसान; हुथींवर संशय
2

Saudi Arebia News : सौदी अरेबियाच्या आर्थिक केंद्रावर हल्ला ? अरामको टॉवरचे नुकसान; हुथींवर संशय

Yeman Breaking : येमेनमध्ये विस्थापनाचा कहर; ३ लाखांहून जास्त नागरिक बेघर, १.६५ लाख मुलांचे भविष्य अंधारात
3

Yeman Breaking : येमेनमध्ये विस्थापनाचा कहर; ३ लाखांहून जास्त नागरिक बेघर, १.६५ लाख मुलांचे भविष्य अंधारात

Agriculture career: शेती-शिवार आता बनले कॉर्पोरेट हब! १२ वी ॲग्रीकल्चरनंतर ‘या’ कोर्सेसना आहे मोठी मागणी; पाहा जॉब ऑप्शन्स
4

Agriculture career: शेती-शिवार आता बनले कॉर्पोरेट हब! १२ वी ॲग्रीकल्चरनंतर ‘या’ कोर्सेसना आहे मोठी मागणी; पाहा जॉब ऑप्शन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.