Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर खड्डेमुक्त; रस्त्यांच्या कामांची नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

यंदाच्या मान्सूनमध्ये महाबळेश्वर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. काही भागांतील रस्ते वाहून गेले होते, तर प्रमुख मार्गांवर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2026 | 02:46 PM
दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर खड्डेमुक्त; रस्त्यांच्या कामांची नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी.

दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर खड्डेमुक्त; रस्त्यांच्या कामांची नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी.

Follow Us
Follow Us:
  • दिवाळी हंगामापूर्वी महाबळेश्वर खड्डेमुक्त
  • नगरपालिकेकडून रस्ते दुरुस्तीची युद्धपातळीवर कामे
  • नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
महाबळेश्वर : प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर शहरात आगामी दिवाळी हंगामात होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेने रस्ते दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे महाबळेश्वर शहर आता पूर्णपणे खड्डेमुक्त झाले असून पर्यटकांच्या स्वागतासाठी रस्ते सुसज्ज होत आहेत.

यंदाच्या मान्सूनमध्ये महाबळेश्वर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. काही भागांतील रस्ते वाहून गेले होते, तर प्रमुख मार्गांवर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले होते. रस्त्यांच्या या बिकट अवस्थेमुळे पर्यटनावर आणि स्थानिक वाहतुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि महाबळेश्वरच्या पर्यटनाला फटका बसू नये यासाठी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी तातडीने बैठक घेऊन संपूर्ण शहरातील रस्ते दुरुस्त करण्याचा खंबीर निर्णय घेतला.

रस्ते दुरुस्तीच्या या मोहिमेत शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या ‘महात्मा गांधी रस्त्या’च्या कामाला विशेष प्राधान्य देण्यात आले. यापूर्वी हा रस्ता अर्धा सिमेंटचा व अर्धा डांबरी अशा स्वरूपात होता. पालिकेने या रस्त्याचा कायापालट करत संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठेकेदार नीरज आगवेकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली. रस्त्यासोबतच पावसाचे पाणी योग्य रीतीने वाहून जाण्यासाठी याच मार्गावर अत्याधुनिक काँक्रीटचे तयार गटारे (Pre-cast Concrete Gutters) बसविण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

शहरात सुरू असलेल्या या सर्व विकासकामांची व रस्ते दुरुस्तीची प्रत्यक्ष पाहणी नुकतीच नगराध्यक्ष सुनील शिंदे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी केली. या पाहणी दौऱ्यात नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्यासोबत नगरसेवक ॲड. संजय जंगम, अफजल सुतार, अशोक शिंदे तसेच मुख्याधिकारी योगेश पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. पाहणीदरम्यान मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी नगराध्यक्षांना शहरातील रस्ते, गटारे व सुरु असलेल्या इतर कामांची सविस्तर माहिती दिली.

पाहणीदरम्यान रस्त्यांच्या कामाची पाहणी करताना नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत ताकीद दिली. “रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत (Quality) कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दिवाळीचा पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी ही सर्व कामे अत्यंत दर्जेदार पद्धतीने आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत,” अशा कडक सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

नगराध्यक्ष सुनील शिंदे हे केवळ बंदिस्त कार्यालयात न बसता रोज प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर उतरून कामांची पाहणी करतात, त्रुटी लक्षात आणून देतात आणि तातडीने सूचना करून कामे पूर्ण करून घेतात. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या या सक्रिय व तत्पर कार्यपद्धतीमुळे महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिक अत्यंत समाधानी असून ते नगराध्यक्ष, नगरसेवक व पालिकेच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक कौतुक करत आहेत. रस्ते दुरुस्त झाल्यामुळे यंदाचा दिवाळी हंगाम पर्यटक आणि स्थानिक व्यापारी दोघांसाठीही आनंददायी ठरणार आहे.

FAQ

1. महाबळेश्वर शहरात रस्त्यांची कामे का हाती घेण्यात आली?
दिवाळीच्या सुट्यांमध्ये महाबळेश्वरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये आणि पर्यटनाला फटका बसू नये यासाठी रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली.

2. महाबळेश्वरमधील रस्त्यांची अवस्था का खराब झाली होती?
यंदाच्या मान्सूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले, तर अनेक मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले होते.

3. रस्त्यांच्या कामांची पाहणी कोणी केली?
महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी रस्ते दुरुस्ती आणि सुशोभीकरणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

Web Title: Mahabaleshwar made pothole free ahead of the diwali season nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Satara News

संबंधित बातम्या

माण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; खरीप वाया गेला, रब्बी हंगाम धोक्यात
1

माण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; खरीप वाया गेला, रब्बी हंगाम धोक्यात

Satara News : कोल्हापुरात ऊसाला 4200 रुपये दर, पण साताऱ्यात कोंडी कायम! शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार?
2

Satara News : कोल्हापुरात ऊसाला 4200 रुपये दर, पण साताऱ्यात कोंडी कायम! शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार?

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या
3

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या

Satara News : महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांचा अंत पाहिला; ३० तासांपासून हजारो नागरिक रस्त्यावर अडकले
4

Satara News : महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांचा अंत पाहिला; ३० तासांपासून हजारो नागरिक रस्त्यावर अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.