Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्षे! प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ऐतिहासिक प्रवेश दिन उत्साहात साजरा

Dr Ambedkar School 125th Entry Day Anniversary: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमधील ऐतिहासिक शाळा प्रवेशाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याने शाळेत प्रवेश दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 08, 2026 | 04:53 PM
Dr Ambedkar School Entry Day

Dr Ambedkar School Entry Day

Follow Us
Follow Us:
  • बाबासाहेबांच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा
  • १२५ वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी याच शाळेत घेतला होता प्रवेश
  • प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शाळा प्रवेश दिनाचा विशेष सोहळा
सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील जिल्हा परिषद संचलित श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेऊन आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली होती. या ऐतिहासिक घटनेला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेत शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांच्या शैक्षणिक आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्यात आला.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nalasopara Police : रस्ते गिळणाऱ्या गॅरेजचालकांवर पोलिसांचा बडगा! नालासोपारात चार जणांविरोधात गुन्हे दाखल

७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या शाळेत प्रवेश घेतला होता. याच शाळेत त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पुढे त्यांनी मुंबईसह अमेरिका आणि लंडन येथे उच्च शिक्षण घेत विविध पदव्या संपादन केल्या. शिक्षणाच्या बळावर त्यांनी सामाजिक विषमता, जातिभेद आणि अन्यायाविरोधात लढा उभारला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री तसेच भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशाला जगातील आदर्श संविधान दिले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या की, बाबासाहेबांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील जातिभेदाची दरी दूर करून प्रत्येक नागरिकाला समान न्याय आणि शिक्षणाची संधी मिळावी, हा त्यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांची जडणघडण झालेल्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये शाळा प्रवेश दिन साजरा होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

या वर्षाचे आणखी एक ऐतिहासिक महत्त्व म्हणजे राजवाड्याच्या द्विशताब्दी वर्षासह प्रतापसिंह हायस्कूलच्या अधिकृत मान्यतेला १७५ वर्षे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. अशा तीन ऐतिहासिक घटनांचा योग यंदा जुळून आला आहे.

प्रतापसिंह हायस्कूलने आपल्या २०६ वर्षांच्या ज्ञानदानाच्या परंपरेत अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वे घडवली आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश गजेंद्रगडकर, ज्येष्ठ उद्योगपती तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू यांसारख्या मान्यवरांनी या शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक शाळेचा वारसा जपण्याबरोबरच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची, शैक्षणिक संघर्षाची आणि सामाजिक समतेच्या विचारांची ओळख करून देण्यात आली. बाबासाहेबांच्या शिक्षणप्रवासाची सुरुवात झालेल्या याच ऐतिहासिक वास्तूमध्ये शाळा प्रवेश दिन साजरा झाल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Satara News: ‘शेतकऱ्यांच्या नरड्यावर पाय देऊ नका, साखर सम्राटांची मस्ती उतरवू’; ऊसदरावरून राजू शेळके आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश कधी घेतला होता?

    Ans: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता.

  • Que: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाला २०२५ मध्ये किती वर्षे पूर्ण झाली?

    Ans: ७ नोव्हेंबर २०२५ रोजी बाबासाहेबांच्या ऐतिहासिक शाळा प्रवेशाला १२५ वर्षे पूर्ण झाली.

  • Que: प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शाळा प्रवेश दिन का साजरा करण्यात आला?

    Ans: बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशाच्या १२५व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या शैक्षणिक प्रवास, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांना उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Web Title: Dr babasaheb ambedkar 125th school entry anniversary pratapsinh high school satara pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Dr. Babasaheb Ambedkar
  • Maharashtra school
  • Satara News

संबंधित बातम्या

दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर खड्डेमुक्त; रस्त्यांच्या कामांची नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1

दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर खड्डेमुक्त; रस्त्यांच्या कामांची नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

माण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; खरीप वाया गेला, रब्बी हंगाम धोक्यात
2

माण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; खरीप वाया गेला, रब्बी हंगाम धोक्यात

Satara News : कोल्हापुरात ऊसाला 4200 रुपये दर, पण साताऱ्यात कोंडी कायम! शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार?
3

Satara News : कोल्हापुरात ऊसाला 4200 रुपये दर, पण साताऱ्यात कोंडी कायम! शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार?

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या
4

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.