
Fake Death Drama: "मी वेडी नाही, माझा पती जिवंत आहे!" ४ वर्षांनंतर आलेल्या एका DNA रिपोर्टने पोलिसांचे धाबे दणाणले!
या धक्कादायक घटनेची सुरुवात सप्टेंबर २०२२ मध्ये झाली. कल्याण येथील नम्रता (नाव बदललेले) या आपल्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी नवघर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता उलट त्यांच्याशी वाद घातला आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण केली.
यानंतर १९ सप्टेंबर रोजी पती घर सोडून गेल्याची तक्रार नम्रता यांनी दिली. परंतु, त्यानंतरच्या घडामोडी चक्रावून टाकणाऱ्या होत्या. पोलिसांच्या दाव्यानुसार, तक्रारीच्या दुसऱ्याच दिवशी खाडीत एका पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह नम्रता यांना दाखवण्यात आला नाही, तर पतीच्या भावानेच हा मृतदेह आपल्या भावाचा असल्याचे सांगत ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी नम्रता यांच्यावरच पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
खाडीत सापडलेला मृतदेह पतीचा नाहीच आणि पती जिवंत असून अनेकांनी त्याला पाहिले आहे, असा टाओ नम्रता वारंवार मारत होत्या. मात्र, पोलिसांनी आणि सासरच्या लोकांनी त्यांच्या दाव्याकडे दुर्लक्ष करत त्यांना ‘मानसिकदृष्ट्या आजारी’ ठरवले आणि थेट मनोरुग्णालयात पाठवून दिले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पतीच्या भावाचे आणि मुलाचे डीएनए (DNA) नमुने घेण्यात आले होते, परंतु त्याचा अहवाल नम्रता यांच्यापासून लपवून ठेवण्यात आला.
मनोरुग्णालयातून परत आल्यानंतर नम्रता यांनी डीएनए अहवालाची सातत्याने मागणी केली. मात्र, प्रशासन अहवाल देण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांनी थेट माहितीच्या अधिकाराचा (RTI) वापर केला. तब्बल ४ वर्षांनंतर हाती आलेल्या या डीएनए अहवालाने सर्वांचेच धाबे दणाणले. अहवालात स्पष्ट नमूद होते की, खाडीत सापडलेला तो मृतदेह नम्रता यांच्या पतीचा नव्हताच! या खुलाशाने नम्रता यांचा दावा खरा ठरला असून पतीने पोलिसांच्या मदतीने हा संपूर्ण कट रचल्याचे उघड झाले आहे. यानंतर नम्रता यांनी न्यायालयात धाव घेतली असून फरार पती, त्याचा भाऊ, वहिनी आणि या कटात साथ देणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Ans: कल्याणमधील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली, जिथे पीडित महिलेवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Ans: पोलिसांनी आणि सासरच्या लोकांनी पत्नीचा दावा फेटाळून लावत तिला वेडी ठरवले आणि चक्क मनोरुग्णालयात डांबून ठेवले.
Ans: डीएनए अहवालातून स्पष्ट झाले की खाडीत सापडलेला मृतदेह त्या महिलेच्या पतीचा नव्हताच; पतीने पोलिसांशी संगनमत करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता.