Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Helgaon Murder Case: कराडच्या हेळगावात रस्त्याच्या वादातून कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; २८ वर्षीय तरुणाचा खून

Karad Crime: ही घटना रविवारी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास हेळगाव येथील प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोर घडली. रस्त्याच्या कारणावरून दोन्ही गट समोरासमोर आले आणि पाहता पाहता वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 21, 2026 | 04:42 PM
Karad Crime, Satara News, Helgaon Murder, Road Dispute,

Karad Crime, Satara News, Helgaon Murder, Road Dispute,

Follow Us
Follow Us:
  • कराड तालुक्यातील हेळगाव येथे रस्त्याच्या वादातून दोन गटांत प्राणघातक हाणामारी.
  • कुऱ्हाड, कोयता, लोखंडी टोचा व लाकडी दांडक्यांचा वापर करून एकमेकांवर हल्ला.
  • हल्ल्यात २८ वर्षीय तरुण सूरज भरत सूर्यवंशी याचा निर्घृण खून; अनेक जण जखमी
Karad Helgaon Murder News: कराड तालुक्यातील हेळगाव येथे रस्त्याच्या वाटेच्या वादातून रविवारी दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. कुराड, कोयता, लोखंडी टोचा, लाकडी दांडक्यांचा वापर झाला. हाणामारीच्या हल्ल्यात सूरज भरत सूर्यवंशी (वय २८) याचा मृत्यू झाला. या घटनेत दोन्ही बाजूंचे मिळून अनेक जण जखमी झाले. एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या प्रकरणी महिलांसह दहा जणांवर खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर हेळगावमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास हेळगाव येथील प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोर रस्त्याच्या वादातून हा प्रकार घडला.फिर्यादीतील आरोपानुसार, श्रीमंत रामचंद्र सूर्यवंशी हा कुराड, आयुष विठ्ठल सूर्यवंशी हा लोखंडी टोचा, ओंकार उत्तम सूर्यवंशी हा कोयता, विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी, रामचंद्र महादेव सूर्यवंशी हे लाकडी दांडके घेऊन आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्यासह अन्य व्यक्तींनी एकत्र येऊन शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

दुसऱ्या गटातील फिर्यादीनुसार घराशेजारील बाथरूममधून घरात येणाऱ्या सूरज भरत सूर्यवंशी याच्यावर हल्ला करण्यात आला. त्याचप्रमाणे, भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तींवरही कुराड, कोयता, दांडके, दगडांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत प्रज्वल किसन सूर्यवंशी, सौरभ भरत सूर्यवंशी, यश शशिकांत सूर्यवंशी, रेखा शशिकांत सूर्यवंशी, रोहिणी भरत सूर्यवंशी हे जखमी झाल्याची नोंद पोलिसात आहे.

या प्रकारात सूरज भरत सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. दुसऱ्या बाजूचेही दोघेजण जखमी झाल्याची माहिती असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या जखमींबाबतची सविस्तर माहिती घटनेतील त्यांची भूमिका पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, घटनास्थळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी मसूर पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची माहिती घेतली.या प्रकरणाचा पुढील तपास मसूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात करीत आहेत.

Bihar Minor Girl Harassment Video: बिहारच्या रस्त्यांवर मुली सुरक्षित का नाहीत? छेडछाडीच्या ‘त्या

पोलिसांनी दिली समज… तरीही वाद उफाळला

शनिवारी रात्री याच कुटुंबातील व्यक्तींमध्ये रस्त्याच्या वादातून वाद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना बोलावून समज दिल्याची माहिती आहे. मात्र, रविवारी सकाळी पुन्हा वाद उफाळून आल्याने त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. अन् त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला.दरम्यान दरम्यान इन कॅमेरा पोस्टमार्टम केल्यानंतर सुरजचा मृतदेह हेळगाव मध्ये आणण्यात आला. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Web Title: Karad helgaon road dispute murder suraj suryavanshi dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Karad Crime
  • Satara Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.