बिहारमध्ये १० वीच्या विद्यार्थ्यांवर हल्ला; राहुल गांधींचा संतप्त सवाल, व्हिडीओ व्हायरल
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली बिहार राज्य सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. “बिहारमधील जमुई येथील एक व्हिडिओ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला आणि मुलीला रस्त्यात जबरदस्तीने अडवण्यात आले. त्यांचा छळ करण्यात आला, अपमान करण्यात आला आणि मुलीवर हल्ला करण्यात आला. मुलीने हात जोडून तिला सोडून देण्याची विनंती केली, परंतु गुंडांनी तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तिची छेड काढणे सुरूच ठेवले.”
Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा
“या लोकांना इतके असभ्यपणे वागण्याचा अधिकार कोणी दिला?” असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला, “ही संस्कृती नाही; ही पुरुषसत्ता आहे. मुलीच्या शरीरावर, तिच्या हालचालींवर आणि तिच्या आवडीनिवडींवर पुरुष नियंत्रित करू शकतात, ही मानसिकता दिसून येते. पण “अंधभक्त हा प्रकार सामान्य असल्याचे ठरवतात, त्यावेळी अशा मानसिकेतेचे लोक हाच कायदा असल्याचे समजू लागतात.
पण आता व्हिडिओमध्ये दिसलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवून गुन्हेगारांवर पॉक्सो कायद्याअंतर्गत खटला चालवून त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी.अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. “जर ही घटना १९ सप्टेंबर रोजी घडली असेल, तर गुन्हेगार अजूनही तुरुंगात का नाहीत? असा सवाल उपस्थित करत, बिहारच्या रस्त्यावर सायंकाळी सात वाजताही मुली सुरक्षित का नाहीत, याचे उत्तर बिहार सरकारने द्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
बिहार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी या प्रकरणात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, आयोगाने या घटनेची दखल घेतली असून, पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक पथक घटनास्थळी जाईल. जमुईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर अध्यक्षांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. अशा घटना असह्य असून कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, ती मुलगी हात जोडून त्यांना सोडून देण्याची विनवणी करत आहे. या घटनेदरम्यान काढलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Ration Card PHH vs AAY: Ration Cardवर PHH की AAY? तुमचं कार्ड कोणत्या प्रकारचं, महिन्याला किती
या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जिल्हाधिकारी नवीन यांनी याला दुजोरा दिला. जमुईचे पोलीस अधीक्षक विश्वजीत दयाल म्हणाले की, त्यांच्या निदर्शनास एक व्हिडिओ आला, ज्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग होत होता. त्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात आले, ज्यावरून ही घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडल्याचे समोर आले. दयाल म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस जनजागृती मोहीमही सुरू करणार आहेत.
The video from Jamui, Bihar is deeply disturbing. Two Class 10 students were stopped on a road. Harassed. Humiliated. Molested. A young girl, hands folded, begged to be let go while goons groped her and dragged her away. Who gave these men the right to behave like this? This is… — Rahul Gandhi (@RahulGandhi) September 21, 2026






