
crime (फोटो सौजन्य: social media)
कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका ३९ वर्षीय महिला होमगार्डसोबत नराधमांनी घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या ओळखीच्याच एका पुरुषाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्याने तिची फसवणूक करत तिला आधी दारू पाजली आणि त्यानंतर चार आरोपींनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
Thane Crime: डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा उघडकीस! गुन्हे शाखेची छापेमारी; निवडणुकी आधी खळबळ
काय घडलं नेमक?
पोलिसांनुई दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कुश्टगी शहरात तिच्या नातेवाईकांना भेटायला गेली होती. त्यानंतर, पीडितेच्या ओळखीची लक्ष्मण केंचप्पा करगुली नावाची व्यक्ती तिला बाईकवर बसवून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली. आरोपी लक्ष्मणने तिला ज्यूस असल्याचं सांगून दारू पाजली आणि नंतर, चार जणांनी मिळून पीडितेवर बलात्कार केला अशी तक्रार करण्यात आली.
पीडितेने कशी दिली पोलिसांना माहिती?
घटनेनंतर, पीडितेने कसंबसं पोलिसांच्या इमरजेन्सी रिस्पॉन्स सपोर्स सिस्टमला फोन केला. याघटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेला गंभीर अवस्थेत येलबुर्गाच्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी नेलं. मात्र, पीडितेची प्रकृती आणखी खालावत गेली. त्यानंतर, सरकारी रुग्णालयतील डॉक्टरांनी तिला कोप्पलच्या KIMS रुग्णालयात रेफर केलं. सध्या, पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
पीडितेच्या पतीने व्यक्त केली वेदना
त्यावेळी, पती म्हणाला की “माझ्या पत्नीसोबत खूपच वाईट घटना घडली आहे. खरं तर, माझ्या पत्नीला अपघात झाल्याचं मला सांगण्यात आलं होतं.” पोलिसांनी आता या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
Ans: दारू
Ans: होमगार्ड
Ans: कर्नाटक