
crime (फोटो सौजन्य: social media)
कोणते शस्त्र पोलिसांनी जप्त केले?
पोलिसांनी छाप्यादरम्यान 2,12,500 रुपयांची बेकायदेशीर शस्त्रे जप्त केली. ज्यात ३ देशी बनावटीचे पिस्तूल, 3 जिवंत काडतुसे, 2 रिकामे मॅगझिन, 2 खंजीर, 4 धारदार चाकू आणि 1 तलवार यांचा समावेश आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात रोशन झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीकडे अजूनही शस्त्रे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस अधिक तपास करत आहे.
कशी केली कारवाई?
कल्याण गुन्हे शाखेचे पोलिसकर्मी दत्ता भोसले यांना डोंबिवलीतील देसले पाडा येथील गोकुळधाम टॉवरमधील एका फ्लॅटमध्ये बेकायदेशीर शस्त्रे लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. माहितीच्या खात्री पटल्यानंतर, गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने तात्काळ छापा टाकून कारवाई केली. येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची आहे. असे म्हटले जाते की आरोपी रोशनकडे आणखी शस्त्रे असण्याची शक्यता आहे, पुढील तपास सुरू आहे.ही शस्त्रे कोणत्याही राजकीय नेत्याशी किंवा आगामी निवडणुकांशी संबंधित आहेत का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कल्याण गुन्हे शाखेने 13 नोव्हेंबर रोजी कारवाई करून आरोपीला अटक केली होती, परंतु चार दिवसांनी पत्रकार परिषद घेतल्याने कल्याण गुन्हे शाखेचे पथकावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.काही दिवसांवर महापालिका निवडणुका येत असल्याने, डोंबिवलीतील एका फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडणे हा पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
Ans: डोंबिवली
Ans: रोशन
Ans: युनिट-३