
crime (फोटो सौजन्य: social media)
Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर सिंह हे फुलेनगर वाडीत आपल्या कुटुंबासह राहतात तसेच परिसरात त्यांचा तबेलाही आहे. सोमवारी दुपारी ते आपल्या गाडीचे तुटलेले वेल्डिंग काम करून घेण्यासाठी घराजवळील एका दुकानात गेले होते. तेव्हाच काही तरुण मोटरसायकलवरून अचानक आले आणि त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता सुधीर यांच्यावर थेट हल्ला चढवला. आरोपींकडे तलवार, कोयता आणि इतर धारदार हत्यारे होती. त्यांनी जीव घेण्याच्या उद्देशाने सुधीर यांना पाठीवर, हातावर आणि पायावर जबर मारहाण केली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट
या हल्ल्यात सुधीर सिंह गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी पळ काढताना सुधीर यांची मोटरसायकलसुद्धा फोडून टाकली. पळून जाण्याच्या घाईत त्यांनी परिसरात मोठा गोंधळ उडवला. या सर्व हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येत असून पोलिसांनी ते पुरावा म्हणून जप्त केले आहे.
या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांच्या टोळीचा शोध वेगाने सुरू केला असून त्यांच्या हालचालींचा माग घेतला जात आहे. संबंधित आरोपींच्या ओळखीचे धागेदोरे मिळाल्याचेही समजते. शहरात वाढत असलेल्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. विशेषतः तलवार-कोयत्यांसारख्या शस्त्रांचा खुलेआम वापर होत असल्याने लोकांमध्ये भयाचे वातावरण आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाला या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता या हिंसक टोळीला पकडणे आणि नागरिकांचा विश्वास पुनर्स्थापित करणे, हेच पोलिसांसमोरील मोठे काम ठरणार आहे.
Ans: फुलेनगर
Ans: सुधीर
Ans: सीसीटीव्ही