Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

कर्नाटकातील बेलगावमध्ये माजी सैनिक संदीप मंजारी यांच्या मृत्यूचे गूढ तीन महिन्यांनी पुन्हा समोर आले आहे. अपघातानंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरावर हत्येचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी कबरीतून मृतदेह बाहेर काढून नमुने FSLकडे पाठवले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 09, 2026 | 12:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • संदीप मंजारी यांचा अपघातानंतर रुग्णालयात मृत्यू झाला होता.
  • पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरावर हत्येचा गंभीर आरोप करण्यात आला.
  • तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून नमुने FSLकडे तपासणीसाठी पाठवले.
कर्नाटक: तीन महिन्यांपूर्वी झालेला अपघात, त्यानंतर रुग्णालयात झालेला मृत्यू आणि अंत्यसंस्कारानंतर अचानक समोर आलेले गंभीर आरोप… या सगळ्यामुळे माजी सैनिक संदीप मंजारी यांच्या मृत्यूचे गूढ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अपघातामुळे त्यांचा मृत्यू झाला की उपचारादरम्यान त्यांना विष देऊन हत्या करण्यात आली, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेत तब्बल तीन महिन्यांनी संदीप यांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आहे.

काय नेमकं प्रकरण?

हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव संदीप मांजरी (45 वर्ष) असे आहे. ते हुक्केरी तालुक्यात घोडगेरी गावचे रहिवासी आहे. याच वर्षी मंदिराच्या जत्रेतून परतत असतांना त्यांचा रस्ते अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले आणि हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून संपल्याचे मानले जात होते.मात्र काही काळानंतर संदीपच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूबाबत गंभीर संशय व्यक्त केला. त्यामुळे तीन महिन्यांनंतर पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया करावी लागली.

पिस्तूल विक्रीचा डाव उधळला, गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चौघांना ठोकल्या बेड्या

संदीपच्या कुटुंबीयांचे आरोप काय?

संदीप यांच्या कुटुंबियांचे आरोप आहेत की संदीप यांना रुग्णालयात उपचार सुरू असताना ग्लुकोजच्या बाटलीतून विष देण्यात आला आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू केली. दरम्यान, पुंडलिक डोंबरचा एक सेल्फी व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये त्याने अनेक गंभीर दावे केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, सुमा हिने संदीप यांच्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीचा उल्लेख केला होता. विम्याची रक्कम मिळाल्यानंतर दोघेही बेलगावमध्ये नवीन आयुष्य सुरू करण्याचा विचार करत असल्याचा दावाही त्याने केला. आणखी एक दावा त्याने या सेल्फी व्हिडीओमध्ये पुंडलिकने केला आहे. संदीप यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना कीटकनाशक आणण्यास सांगण्यात आले होते, असे त्याने म्हटले आहे.

३ महिन्यांनंतर काढला संदीपचा मृतदेह

कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि तक्रारीनंतर पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेत संदीपचा मृतदेह तीन महिन्यानंतर कबरीतून बाहेर काढला. बेलगावचे सहायक आयुक्त श्रवण कुमार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया करण्यात आली. मृतदेहाचे नमुने घेण्यात आले असून ते पुन्हा तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अर्थात FSL कडे पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी संदीप यांची पत्नी सुमा मंजारी आणि कथित प्रियकर पुंडलिक डोंबर यांची चौकशी केली आहे. यमकनमरडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.

Odisha Crime : नशेत पित्याचं भयंकर कृत्य; पैशांवरून वाद, लाकडी दांडक्याने केली मुलाची हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: संदीप मंजारी यांचा मृत्यू कशानंतर झाला होता?

    Ans: अपघातानंतर

  • Que: कुटुंबीयांनी किती रुपयांच्या विम्याचा दावा केला?

    Ans: 2 कोटी

  • Que: मृतदेहाचे नमुने कुठे पाठवले?

    Ans: FSL

Web Title: Karnataka crime poison in iv fluid leads to ex servicemans death body exhumed after 3 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.