Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak Crime: कर्नाटकात थरारक हत्याकांड! भररस्त्यात 16 वार; मृतदेहावर पाय ठेवून आरोपीने पोलिसांची पाहिली वाट

कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील सावदत्ती तालुक्यात भररस्त्यात 51 वर्षीय व्यक्तीची 16 वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेहावर पाय ठेवत पोलिसांची वाट पाहिली. जुन्या वैरातून हा खून झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 04, 2026 | 02:37 PM
रिक्षाचालकांकडून तरुणांना मारहाण

रिक्षाचालकांकडून तरुणांना मारहाण

Follow Us
Follow Us:
  • सावदत्ती तालुक्यात भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी भीषण हत्याकांड
  • आरोपीने धारदार शस्त्राने 16 वार करून व्यक्तीची हत्या केली
  • हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच पोलिसांना फोन करून माहिती दिली
कर्नाटक: कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची भररस्त्यात अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृत व्यक्तीच्या छातीवर पाय ठेवून पोलिसांची वाट पहिली. मृतव्यक्तीचे नाव बसप्पा होसमानी (वय 51, बसडोणी गावाचा रहिवासी) असे आहे. ही घटना हुलिकट्टी गावाजवळील रस्त्यावर सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गाव हादरून गेले आहे.

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी बसप्पा काही कामानिमित्त रस्त्याने जात असताना आधीपासून दबा धरून बसला होता. त्याने एरय्या मठपती याने त्याला अडवले. त्यांनतर धारदार शस्त्राने बसप्पावर सपासप वार करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तब्बल 16 वेळा वार केले. यात बसप्पाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने नारीकांमध्ये खळबळ उडाली होती. ही घटना सावदत्ती शहराजवळ घडली असून हा परिसर प्रसिद्ध येल्लम्मा देवीच्या मंदिरामुळे धार्मिक आणि संवेदनशील मानला जातो. हि घटना भर रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मृतदेहावर पाय ठेवून उभा

आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतः पोलिसांना हत्येची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता आरोपी मृतदेहाजवळ उभा असून त्याचा एक पाय मृताच्या छातीवर ठेवलेला होता. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

हत्या करण्यामागचं कारण काय?

या घटनेमागील धक्कादायक कारण पोलीस तपासात समोर आला आहे. आरोपी एरय्या मठपती आणि मृतक बसप्पा होसमानी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैर होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी बसप्पा हा आरोपीच्या आईसोबत घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर दोघे कोल्हापूरमध्ये राहत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर एरय्या मनात तीव्र राग आणि सूडाची भावना बाळगून होता. काही दिवसांपूर्वी बसप्पा पुन्हा आपल्या गावात आणि आसपासच्या परिसरात परतल्याची माहिती एरय्याला मिळाली. त्यानंतर त्याने सूड उगवण्याचा निर्णय घेतला आणि योग्य संधी साधून ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस तपास सुरु

पोलीस या घटनेचा तपास करत असून त्याने ही हत्या एकट्याने केली, की त्याच्यासोबत त्याला कुणाची मदत होती. याचा तपास सुरु आहे. पोस्टमॉर्टेम अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने सावदत्ती तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Mumbai Crime: आयआयटी बॉम्बेमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; हॉस्टेल परिसरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कुठे आणि कधी घडली?

    Ans: बेळगाव जिल्ह्यातील सावदत्ती तालुक्यात हुलिकट्टी गावाजवळ सोमवारी सायंकाळी.

  • Que: मृत व्यक्ती आणि आरोपी कोण आहेत?

    Ans: मृताचे नाव बसप्पा होसमानी (वय 51) असून आरोपी एरय्या मठपती आहे.

  • Que: हत्येमागचं कारण काय?

    Ans: दोघांमध्ये जुन्या वैरातून आणि कौटुंबिक कारणावरून आरोपीने सूड उगवला.

Web Title: Karnataka crime thrilling murder in karnataka 16 stab wounds in broad daylight the accused waited for the police standing with his foot on the dead body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.