व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा (फोटो- istockphoto)
क्रिप्टो करन्सीमध्ये ज्यादा नफ्याचे प्रलोभन दाखवत केली पैशांची लूट
संशयित आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
ऑनलाइन पद्धतीने लावला चुना
रत्नागिरी: फेसबुक वर झालेली महिलेची ओळख एका व्यावसायिकाला महागात पडली आहे. क्रिप्टोक्रम करन्सीच्या माध्यमातून लाखो रुपये मिळविण्य मिळविण्याचे प्रलोभन दाखवत या भामट्या महिलेने या व्यावसायिकाला ३६ लाख ६५ हजार रुपयांना ऑनलाइन चुना लावला आहे. फसवणुकीची ही घटना 4 जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी येथील गांधी फॅब्रिकेटर्स या फिर्यादीच्या दुकानात घडली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यावसायिकाने सुहानी शर्मा आणि डॅनियल या दोघांविरोधात रत्नागिरी सायबर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये या व्यावसायिक फिर्यादीने म्हटले आहे की फेसबुक या समाज माध्यमावर सुहानी शर्मा या महिलेशी त्यांची ओळख झाली होती. त्या महिलेने या व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून आपला मित्र डॅनियल हा क्रिप्टो करन्सी मार्केटच्या ट्रस्टीन कॉइन या वेब एप्लीकेशनचा सीनियर अकाउंटंट मॅनेजर असल्याचे फिर्यादीला भासवले.
त्यानंतर फिर्यादीला यूएसडीटी ट्रेडिंग करून कमी वेळात जास्त नफ्याचे प्रलोभन दाखवले. फिर्यादी व्यावसायिकाने महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिचा मित्र डॅनियल याने व्हाट्सअप वर पाठवलेल्या एप्लीकेशन लिंक वर क्लिक करून त्या अॅप्लिकेशनला लॉगिन केले. त्यानंतर आरोपीने २२ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या ११ दिवसांच्या कालावधीत वेळोवेळी दिशाभूल करीत फिर्यादीला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. याप्रकारे फिर्यादीने संशयीताच्या प्रलोभनांना बळी पडून या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तब्बल ३६ लाख ६४ हजार ७४० रुपये फिर्यादी कडून गुंतवून घेतले आणि फसवणूक केली. फिर्यादी व्यावसायिक यांनी रत्नागिरी सायबर पोलिसांकडे धाव घेत याबाबतची तक्रार दिली आणि या तक्रारीवरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरट्यांचे कारस्थान
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ऑनलाईन चलन केले जाते. याच माध्यमातून नाशिकमध्ये फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहतूक विभागाकडून देण्यात आलेले ई-चलन प्रलंबित असल्याचा खोटा मेसेज पाठवून सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल २६ लाख रूपयांवर डल्ला मारला. यात एकाच व्यक्तीच्या बँक खात्यातील कर्जाच्या स्वरूपात आलेल्या १८ लाख रूपयांचाही समावेश आहे.
ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, खासगी नोकरी करणाऱ्या तक्रारदाराने एका गरजेसाठी १८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम संबंधित बँकेने थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली. यानंतर, काही तासांतच तक्रारदाराच्या व्हॉट्सअॅपवर ‘आरटीओ ई-चलन’ चा संदेश आला. या संदेशासोबत एपीके फाईल जोडलेली होती. तक्रारदाराने सदर फाईल अधिकृत समजून त्यावर क्लिक केले.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






