Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट; चेतनच्या वडिलांचा दावा- मुलाला बळजबरीने गोवण्यात आलं

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवे वळण आले आहे. आरोपी चेतन चौधरीचे वडील बाबूलाल चौधरी यांनी मुलाचा या घटनेशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या तपासानुसार सिया आणि चेतनवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे, तर चेतनचे कुटुंब त्याला निर्दोष सांगत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 25, 2026 | 10:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चेतन चौधरीच्या वडिलांनी मुलाला प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला.
  • पोलिसांकडून तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू.
  • सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावरील आरोपांवर पुढील तपास सुरू आहे.
पुणे: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेला केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. लोहगड किल्ल्यावरून तरुण व्यवसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याला दरीत ढकलून सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून हत्या केली. चेतन चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी त्याने आपल्या नोकराचा फोण वापरला. नोकराच्या फोनचे लोकेशन देखील लोहगडाच्या जवळपास आढळले आहेत. आता या प्रकरणी नोकर नीरज कुमार याने पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र आता आरोपी चेतन चौधरी याच्या वडिलाने “चेतनचा या हत्येशी काहीही संबंध नाही,त्याला या प्रकरणात बळजबरीने गोवण्यात आले आहे,” असा दावा केला आहे. (Ketan Agrawal Murder Case)

काय म्हणाले चेतनचे वडील?

मुख्य आरोपी चेतन चौधरी (chetan chaudhari) याचे वडील बाबूलाल चौधरी यांनी प्रसार माध्यमांसमोर येत आपल्या मुलाची बाजू मंडळी आहे. त्यांच्या कुटुंबाचा सिया गोयल नावाच्या मुलीशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नव्हता. सिया आणि चेतन यांच्यात मैत्री होती किंवा ते एकमेकांसोबत फिरत होते, हे आम्हाला आता पोलिसांनी अटक केल्यानंतर समजले. आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आजपर्यंत त्या दोघांना एकत्र पाहिलेले नाही. १८ जून रोजी चेतन लोहगड किल्ल्यावर गेला होता, याची पुसटशी कल्पनाही आम्हाला नव्हती. घरातून निघताना त्याने फक्त एका मीटिंगला जात असल्याचे सांगितले होते, असे बाबूलाल चौधरी यांनी स्पष्ट केले. (Ketan Agrawal Murder Case)

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात चेतनच्या नोकर माफीचा साक्षीदार; सिया-चेतनच्या अडचणी वाढल्या

चेतन पोलीस ठाण्यात काय बोलला?

चेतनला जेव्हा पोलिसांनी घरून ताब्यात घेतले, तेव्हाच या प्रकरणाचे गांभीर्य समजल्याचे वडिलांनी सांगितले. पोलीस स्टेशनमध्ये “जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तेव्हा चेतन मला स्पष्टपणे म्हणाला की, ‘माझा या घटनेशी काहीही संबंध नाही. मी तिथे हजर होतो, हे मला बळजबरीने कबूल करायला लावले आहे.’ तो तिथे प्रत्यक्षात हजर होता की नव्हता, हे आम्हाला ठाऊक नाही. तिथे गेल्याचे काही पुरावे पोलीस दाखवत आहेत, पण त्याने आम्हाला काहीही सांगितले नव्हते. चेतनवर यापूर्वी कोणताही आरोप किंवा पोलीस केस नाही.”(Ketan Agrawal Murder Case)

सिया त्याच्या अगदी जवळ उभी…

वडिलांच्या दाव्यानुसार, चेतनने त्यांना सांगितले होते की, घटनेच्या वेळी तो मुख्य स्पॉटपासून काही अंतरावर उभा होता आणि केतन दरीत कोसळला तेव्हा सिया (siya goyal) त्याच्या (केतनच्या) अगदी जवळ उभी होती. पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण किरकोळ असल्याचे सांगितले होते, असाही आरोप त्यांनी केला. (Ketan Agrawal Murder Case)

चेतनच्या काकांनी काय म्हंटल?

या प्रकरणावर चेतनच्या काकांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, “चेतनचा या संपूर्ण प्रकरणात कोणताही रोल नाही. तो अतिशय सज्जन आणि सरळ स्वभावाचा मुलगा आहे. तो मार्केटयार्ड येथे वडिलांच्या ड्रायफ्रूट्स आणि किराणा दुकानाचे काम प्रामाणिकपणे पाहायचा.” (Ketan Agrawal Murder Case)

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; आधी चेतनने ढकलले अन् नंतर सियाने…

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपी कोण आहेत?

    Ans: या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आरोपी करण्यात आले आहे.

  • Que: चेतनच्या वडिलांनी काय दावा केला?

    Ans: चेतनचा हत्येशी संबंध नसून त्याला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला

  • Que: पोलिस कोणत्या आधारावर तपास करत आहेत?

    Ans: पोलिस सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

Web Title: Ketan agrawal murder case new twist in the lohagad murder case chetans father claims his son was forcibly implicated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 10:07 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.