माफीचा साक्षिदार कोण?
मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या दुकानात काम करणाऱ्या नीरज कुमारने पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. आता यामुळे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तपासात नीरजच्या मोबाईलचा वापर कसा करण्यात आला, चेतनने आपले लोकेशन लपवण्यासाठी कोणता डाव आखला आणि लोहगडावरील घटनाक्रम काय होता, याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; आधी चेतनने ढकलले अन् नंतर सियाने…
दिशाभूल करण्यासाठी नोकराचा वापरला फोन
१८ जून म्हणजेच हत्येच्या दिवशी चेतन चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी त्याने आपल्या नोकराचा फोण वापरला. सकाळी सव्वासात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असे जवळपास 10 तास चेतन चौधरीने स्वतःचा मोबाईल त्याचा नोकर नीरज कुमारकडे ठेवला होता. दिवसभरात चेतनच्या मोबाईलवर जेवढे फोन आले, ते सर्व फोन चेतनच्या सांगण्यावरून नीरजने उचलले. जेणेकरून चेतन पुण्यातच किंवा आपल्या दुकानातच हजर आहे, असा आभास निर्माण करता येईल. त्याने केतनची हत्या करण्यासाठी लोहगडावर नीरज कुमारचा मोबाईल सोबत नेला होता.
कोर्टात गुन्हा सिद्ध कसा होणार?
हत्येच्या दिवशी दिवसभर नीराजच्या फोनचे लोकेशन लोहगड किल्ला आणि त्याच्या आसपासच्या परिसरात ट्रेस झाले होते. आता नीरजने स्वतः दिलेल्या जबाबावरून हे सिद्ध झालं आहे की, तो फोन त्याच्याकडे नसून मालक चेतन चौधरीकडे होता. या डिजिटल पुराव्यामुळे आणि नीराजच्या जबाबामुळे हत्येच्या वेळी चेतन चौधरी लोहगडावरच हजर होता आणि त्यानेच केतनला दरीत ढकलले, हे पोलिसांना न्यायालयात 100 टक्के सिद्ध करता येणार आहे.
Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली.
Ans: चेतन चौधरीच्या दुकानात काम करणारा नीरज कुमार हा माफीचा साक्षीदार असल्याचे सांगितले जात आहे.
Ans: मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुरावे तपासात महत्त्वाचे ठरत आहेत.






