Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत…

नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याची चौकशी केली जात आहे. भोंदू तांत्रिकाची सुरू असलेली एसआयटी चौकशी अनेक धक्कादायक खुलासे करत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2026 | 08:05 AM
Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Follow Us
Follow Us:

नाशिक : लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकलेला भोंदू अशोक खरात याच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ललित पोफळे यांची सुमारे ८ कोटी ७६ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात मध्यरात्री अशोक खरातविरुद्ध नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ललित पोफळे हे खरातच्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून काम पाहत होते. त्यामुळे त्यांना खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची पूर्ण कल्पना होती. याच गोष्टीचा फायदा घेत अशोक खरातने पोफळे यांना त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूचा योग असल्याची भीती घातली. हे संकट टाळण्यासाठी आणि अवतारपूजा करण्याच्या नावाखाली त्याने वेळोवेळी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले.

Ashok Kharat : भोंदू खरातचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; महिन्यापासून खरात ताब्यात, फलनिष्पत्ती काय?

दरम्यान, ललित पोफळे यांची यापूर्वीही पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान अशोक खरातचे आर्थिक साम्राज्य आणि फसवणुकीच्या नेटवर्कबाबत अनेक महत्त्वाच्या माहिती समोर आल्या होत्या. पोफळे हे ट्रस्टचे महत्त्वाचे सदस्य राहिल्यामुळे, या नवीन गुन्ह्यामुळे खरातच्या आर्थिक घोटाळ्यांचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारी डॉक्टरच्या मदतीने करायचा गर्भपात

नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याची चौकशी केली जात आहे. भोंदू तांत्रिकाची सुरू असलेली एसआयटी चौकशी अनेक धक्कादायक खुलासे करत आहे. सूत्रांनुसार, अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला खरात सरकारी डॉक्टरच्या नावाखाली गर्भपाताचे रॅकेटही चालवत होता. तपासात असे उघड झाले आहे की, पीडितांपैकी एकाने सरकारी डॉक्टरच्या मदतीने गर्भपात करून घेतला होता.

मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलिस कोठडी

कुडूवाडीत व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता माढा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर भोसलेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात कुडूवाडी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Kharat instilled the fear of his parents death in ca lalit pofale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik Onion Farmers: नाफेडची कांदा खरेदी केवळ कागदावरच! मनमाड, नांदगावात खरेदी केंद्रच नसल्याने शेतकरी संतप्त
1

Nashik Onion Farmers: नाफेडची कांदा खरेदी केवळ कागदावरच! मनमाड, नांदगावात खरेदी केंद्रच नसल्याने शेतकरी संतप्त

नाशिक प्रकरणात ‘टीसीएस’ मलेशियाचा थेट संबंध, झाकीर नाईक, ‘एमआयएम’ नेत्यांची चौकशी करावी, संजय निरुपम यांची मागणी
2

नाशिक प्रकरणात ‘टीसीएस’ मलेशियाचा थेट संबंध, झाकीर नाईक, ‘एमआयएम’ नेत्यांची चौकशी करावी, संजय निरुपम यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.