Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Accident: अंबाबाईच्या दर्शनानंतर घरी परतताना काळाचा घाला; प्रसिद्ध मेस्त्रीचा अपघाती मृत्यू

अंबाबाई आणि बाबुजमाल दर्ग्याचे दर्शन घेऊन बाबुराव लोहार नेहमीप्रमाणे घरी परतत होते. मात्र, रंकाळा परिसरात काही क्षणांतच त्यांच्या प्रवासाचा दुर्दैवी शेवट झाला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 15, 2026 | 05:14 PM
Kolhapur Accident: अंबाबाईच्या दर्शनानंतर घरी परतताना काळाचा घाला; प्रसिद्ध मेस्त्रीचा अपघाती मृत्यू

Kolhapur Accident: अंबाबाईच्या दर्शनानंतर घरी परतताना काळाचा घाला; प्रसिद्ध मेस्त्रीचा अपघाती मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • अंबाबाईचे दर्शन घेऊन घरी परतताना ७३ वर्षीय बाबुराव लोहार यांचा अपघाती मृत्यू
  • रंकाळ्यात खराडे महाविद्यालयासमोर चारचाकीला अज्ञात वाहनाची धडक
  • प्रसिद्ध ट्रक बॉडी मेस्त्रीच्या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात ट्रकची बॉडी तयार करणे आणि दुरुस्तीच्या कामासाठी प्रसिद्ध असलेले मेस्त्री बाबुराव आप्पाजी लोहार (वय ७३) यांचा सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात मृत्यू झाला. कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन चारचाकी वाहनातून घरी परतत असताना रंकाळा परिसरातील खराडे महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

ट्रक बॉडीचे प्रसिद्ध गॅरेज

बाबुराव लोहार यांचे राधानगरी रोडवरील जिवबानाना पार्क परिसरात ट्रक बॉडी तयार करण्याचे गॅरेज आहे. गॅरेजच्या मागे असलेल्या बंगल्यात ते कुटुंबासह राहत होते. ट्रकची बॉडी तयार करणे आणि दुरुस्तीच्या कामातील त्यांच्या कौशल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात त्यांची ओळख होती.

अंबाबाईनंतर बाबुजमाल दर्ग्याला भेट

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे लोहार चारचाकी वाहनातून श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी बाबुजमाल दर्ग्यालाही भेट दिली. दर्शन आटोपल्यानंतर रंकाळा टॉवरमार्गे ते आपल्या घरी परतत होते. सकाळी सुमारे सहाच्या सुमारास खराडे महाविद्यालयासमोर त्यांच्या चारचाकी वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा:Kolhpur Crime: पन्हाळा पोलिसांची २४ तासांत कारवाई; वृद्ध महिलेचे हात-तोंड बांधणारे कापड ठरले महत्त्वाचा पुरावा

मोठा आवाज; नागरिकांची धाव

अपघातावेळी झालेल्या मोठ्या आवाजामुळे रंकाळा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात लोहार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नागरिकांनी तत्काळ १०८ क्रमांकावर संपर्क साधून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

उपचारांपूर्वीच मृत्यू

सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर काही तरुणांनी लोहार यांना ओळखले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या निधनामुळे ट्रक बॉडी तयार करण्याच्या क्षेत्रातील परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime News: जळगाव हादरले!बेपत्ता महिलेचा जंगलात मृतदेह; मैत्रीतील वादातून खुनाचा संशय

अपघाताचा तपास सुरू

अपघातात लोहार यांच्या चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कसा झाला, धडक देणारे वाहन कोणते होते आणि चालकाची ओळख पटते का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Kolhapur rankala accident baburao lohar death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 05:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.