
crime (फोटो सौजन्य: social media)
काय आहे नेमकं प्रकरण?
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची नावे कोमल साहा आणि तिचा लिव्ह -इन-पार्टनर धुब्रा मित्रा याला अटक केली आहे. डेटिंग अॅपवर कोमलने आदर्शसोबत आधी मैत्री केली. त्यानंतर त्यांच्या शारीरिक सुखाच्या बदल्यात 2,000 रुपयांचा व्यवहार निश्चित करण्यात आला. शनिवारी आदर्शने हॉटेलमध्ये ऑनलाईन दोन खोल्या बूक केल्या. कोमल आणि ध्रुबा आधी त्यांच्या खोलीमध्ये गेले. आदर्शने डिलिव्हरी अॅपवरून बिअर आणि चिप्स ऑर्डर देखील ऑर्डर केले. कोमल आणि ध्रुबा यांनी हॉटेलच्या गॅलरीमध्ये बराच वेळ गप्पा मारल्या. त्याच वेळी 20,000 रुपयांच्या मागणीचा प्लॅन ठरला.
कोमल आदर्शच्या खोलीत गेली. आदर्श नशेत असताना तिने तिच्या पार्टनरसोबत खोलीत पैशांची शोधाशोध केली आणि आदर्शच्या वॉलेटमधून 1,500 रुपये काढले. त्यावेळी, अचानक आदर्शला जाग आली आणि ध्रुबाला तिथे पाहून तो चकित झाला. त्यानंतर त्या दोघांनी आदर्शकडे 20,000 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची मागणी केली. आदर्शने पैसे देण्यास नकार दिला आणि त्याने कोमलला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. याच संतापाच्या भरात धुब्रा आणि कोमलने आदर्शचे पाय टॉवेलने बांधले. त्यानंतर तिथे असलेल्या चादरीने तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर ते गॅलरीमधून पळून त्यांच्या जवळच्या खोलीत गेले. हि घटना सुमारे पहाटे अडीच वाजता घडली.
CCTV फुटेजच्या आधारे उघडकीस घटना
पोलिसांनी आरोपी कोमल आणि धुब्रा याला अटक केली. सुरुवातीला दोन्ही आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, घटनास्थळावरील पुरावे आणि CCTV फुटेजमधून सत्य घटना उघडकीस आली. पोलीस पुढील चौकशी करत असून कारवाई करत आहे.
Ans: हॉटेलच्या खोलीत नग्न अवस्थेत.
Ans: 20,000 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची मागणी; पैसे वसुलीसाठी.
Ans: घटनास्थळावरील पुरावे आणि CCTV फुटेजच्या आधारे; आरोपींना अटक करण्यात आली.