Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: लोणी काळभोर येथे गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्‍त; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपी मदन बामने याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, अनधिकृत भरलेले गॅस सिलेंडर हे लोणी काळभोर येथील त्याच्या जय मल्हार गॅस सर्व्हीस या दुकानात ठेवून ग्राहकांना विक्री करीत असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2025 | 10:41 PM
Crime News: लोणी काळभोर येथे गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्‍त; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News: लोणी काळभोर येथे गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्‍त; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:

लोणी काळभोर: घरगुती गॅस सिलेंडरमधून एका लोखंडी नोझलच्या सहाय्याने अवैध व धोकादायक पद्धतीने गॅस काढून त्याची छोट्या मोठ्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्याचा रॅकेटचा पर्दापाश करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 च्या पथकाने ही कारवाई केली आहे. मदन माधव बामने (वय-20, रा. महादेव मंदीराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे (वय 32) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार शेखर काटे यांना लोणी काळभोर येथील महादेव मंदीराजवळ असलेल्या साईसृष्टी बिल्डींग पाठीमागील  एका गोठ्यामध्ये एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस काढून बेकायदा विक्री करीत आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्र. 6 व लोणी काळभोर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा मदन बामने हा अवैधरित्या गॅस भरताना आढळून आला.

या छाप्यात पोलिसांनी  31 हजार 900 रुपये किंमतीच्या एचपी कंपनीच्या 11कमर्शिअल गॅस टाक्या, 17 हजार 150 रुपये किंमतीच्या इंडेन कंपनी 7  घरगुती गॅस टाक्या, 13 हजार  रुपये किमतीच्या पुष्पा कंपनीच्या 9 घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, 51 हजार 450 रुपये किंमतीच्या 21 एचपी कंपनीच्या घरगुती गॅस वापराच्या टाक्या, 19 हजार 450 रुपये किंमत असलेल्या एचपी कंपनीच्या 21 घरगुती वापराच्या रिकाम्या गॅस टाक्या, 14 हजार 700 रुपये किंमतीच्या रिलायन्स कंपनीच्या 6 घरगुती वापराच्या गॅस टाक्या, 3 हजार 500 रुपये किंमतीच्या 2 एचपी कंपनीच्या लहान गॅस टाक्या,  86 हजार रुपये किंमतीच्या एकून 86 लहान वेगवेगळ्या लोकल कंपनीच्या गॅस टाक्या, 500 रुपये किंमतीचे  एकूण 5 नग गॅस ट्रान्सफर करण्याचे लोखंडी नोझल, 200 रुपयांचे एक  पितळी नोझल, 2 हजार रुपये किंमतीचे रेग्युलेटर पाईप व साडेतीन हजारांचा एक इलेक्ट्रीक वजनकाटा असा सुमारे २ लाख 24 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी मदन बामने याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, अनधिकृत भरलेले गॅस सिलेंडर हे लोणी काळभोर येथील त्याच्या जय मल्हार गॅस सर्व्हीस या दुकानात ठेवून ग्राहकांना विक्री करीत असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 283.284 राह जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनीट चे 6  पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार रामहरी वणवे, कानिफनाथ कारखेले, प्रदीप क्षीरसागर, पोलीस अंमलदार  ऋषिकेश व्यवहारे, रमेश मेमाणे, नितीन मुंडे,अक्षय कटके, सचिन सोनवणे, प्रतीक्षा पानसरे, बालाजी बांगर व हवेलीचे पुरवठा निरीक्षक इम्रान मुलाणी यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Loni kalbhor police arrested illegal sale of lpg gas cylinder marathi crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 10:41 PM

Topics:  

  • crime news
  • Loni Kalbhor Police
  • LPG gas cylinder

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
3

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
4

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.