
लखनऊ: ड्रायव्हरच निघाला हत्यारा,साथीदारांसह पीडित व्यक्तीवर झाडल्यागोळ्या .; जमिनीच्या वादातून केली हिंदुत्ववादी नेत्याची हत्या
गोळ्या झाडून करण्यात आली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धीरेंद्र प्रताप सिंह यांचा ड्रायव्हर रवी याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने त्यांच्याच फॉर्च्युनर गाडीत गोळ्या झाडून ही हत्या केली. आरोपींनी एक गोळी धीरेंद्र यांच्या डोक्यात आणि दुसरी पोटात झाडली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वादानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह आणि गाडी डुबग्गा येथील एका कालव्यात फेकून दिली.
गुन्हा लपवण्यासाठी रचला मनघडीत कहानी
आरोपी रवीने गुन्हा लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अनेक बनाव रचले. धीरेंद्र आपल्या मित्रांसोबत ‘पॅलासियो मॉल’मध्ये गेले असून ते अद्याप परतलेले नाहीत, अशी खोटी माहिती त्याने कुटुंब आणि पोलिसांना दिली. याशिवाय, पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने धीरेंद्र यांचा मोबाईल फोन एका चालत्या ट्रेनमध्ये ठेवून दिला, ज्यामुळे सर्व्हिलन्सवर मोबाईलचे लोकेशन सतत बदलत राहिले.
सीसीटीव्ही तपासात आले सत्य समोर
पोलिसांनी मॉलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धीरेंद्र किंवा त्यांची गाडी तेथे आल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. जबाब आणि तपासातील विसंगतीमुळे पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
ट्रेनमध्ये अज्ञात लाल सूटकेस उघडताच पोलिसांना बसला धक्का; तमिळनाडू ते आग्रा प्रवासात नेमक घडलं काय?
विरोधी गटासोबत मिळून रचला कट
संयुक्त पोलीस आयुक्त बबलू कुमार आणि डीसीपी मोहम्मद मुश्ताक यांनी सांगितले की, या हत्येमागे उन्नाव येथील करोडो रुपयांच्या जमिनीचा वाद हे मुख्य कारण आहे. चालकाने विरोधी गटाशी हातमिळवणी करून हा कट रचला होता. पोलिसांनी कालव्यातून मृतदेह आणि फॉर्च्युनर गाडी हस्तगत केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची ६ विशेष पथके छापे टाकत आहेत.