Crime News Live Updates
अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्री गावातून अतिशय धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेत पोटफुगीवर दहा दिवसाच्या बाळाला चक्क गरम विळ्याने तब्बल 39 चटके दिल्याचा अघोरी प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे मेळघाटात अजूनही ‘डंबा’ वर अघोरी उपचार पध्दतीचा अवलंब केला जात असल्याचे समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली असून यात चटके देणाऱ्या वृद्धमहिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर दहा दिवसांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
06 Jul 2025 05:32 PM (IST)
गेल्या काही दिवसाखाली सिंहगड रस्त्यावरील फनटाईम थेटरच्या पाठिमागील भाजी बाजारातूनच भरगर्दीत एका व्यक्तीच्या हातातील ८० हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरट्यांनी चोरून पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे. भाजी आणण्यासाठी संबंधीत व्यक्ती आल्यानंतर रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दरम्यान, याठिकाणी भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी देखील प्रचंड होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत ५० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
06 Jul 2025 05:06 PM (IST)
भविष्य सांगणे तसेच जीवनातील अडीअडचणी दूर करण्याच्या आमिषाने तरुणाच्या बोटातील ६० हजारांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना नारायण पेठेत घडली आहे. याप्रकरणी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
06 Jul 2025 04:34 PM (IST)
वडगावशेरी परिसरातून एका कामगाराचे खंडणीसाठी अपहरण करणार्या तिघांना पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. तिनही आरोपींना बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून ताब्यात घेतले आहे. चंदननगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गौतम केरुजी पोटभरे (वय ३७), अभिजीत वसंत पोटभरे (वय २७) आणि शुभम वसुदेव मायकर (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अपह्त व्यक्तीच्या पत्नीने तक्रार दिली आहे.
06 Jul 2025 03:44 PM (IST)
कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे प्रवेशशुल्क व गणवेशासाठी तगादा लावण्यात आला होता. मात्र, मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी पैसे दिले नाही म्हणून 17 वर्षीय मुलीने घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 4) पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोणसावळी येथे घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सोनिया वासुदेव उईके (वय 17, रा. वॉर्ड क्र. 1, लोणसावळी) आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
06 Jul 2025 03:38 PM (IST)
कोंढव्यातील बलात्कार प्रकरणात पोलिसांनी पिडीत तरुणीच्या डिलीव्हरी बॉय म्हणून येणाऱ्या त्या मित्राला नोटीस बजावली आहे. त्याला अटक करण्यात येणार नसून, पोलिसांना तपासात सहकार्य करावे तसेच तपासकामी बोलाविल्यानंतर पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत नोटीसित म्हंटले आहे, अशी माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.
06 Jul 2025 01:46 PM (IST)
गंगाधाम चौकातील तीव्र उतारावर वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, अखेर त्या ठिकाणी हाइट बॅरिअर बसवण्याचे काम सुरू झाले आहे. याचबरोबर जड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे.
06 Jul 2025 01:25 PM (IST)
जळगावच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात भर दिवसा मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी 26 वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्याने तब्बल 12 राउंड फायर करत संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूमाफिया आणि स्थानिक गटातील संघर्षातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत तरुणाच्या शरीरावर झाडलेल्या गोळ्यांमुळे त्याच्या शरीराची चाळण झाली होती .आकाश कैलास मोरे असे मृत तरुणाचे नाव आहे . या घटनेचा अधिक तपास सुरू आहे .
06 Jul 2025 01:24 PM (IST)
बीडच्या परळीतील अतिशय गजबजलेल्या चौकात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना उजेडात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. परळी शहरातील कायम वर्दळ असलेल्या लक्ष्मीबाई टॉवर चौकात रस्त्याच्या मधोमध हळद कुंकू लिंबू टाकून कोंबड्याचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेल्या दीपक देशमुख यांनी या प्रकार केला आहे. शुक्रवारी भर दुपारी ही घटना घडली असून या प्रकाराची संपूर्ण शहरभर चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान या अघोरी आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटनेची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे.
06 Jul 2025 12:21 PM (IST)
पैशांसाठी आई- वडिलांनी बालिकेची साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली. मीनल ओंकार सपकाळ (वय ३०, रा. बिबवेवाडी) ओंकार औदुंबर सपकाळ (वय २९, रा. बिबवेवाडी), साहिल अफजल बागवान (वय २७, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (वय ३४, रा. येरवडा), सचिन रामा अवताडे (वय ४४, रा. येरवडा), दीपाली विकास फटांगरे (वय ३२, रा. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाल न्याय अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
06 Jul 2025 11:45 AM (IST)
मुंबईच्या गोवंडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका १९ वर्षीय युवकाने आपल्याच १६ वर्षीय मिटला शीतपेयाच्या विष देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. शीतपेय प्यायल्यानंतर १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर १९ वर्षीय तरुणाला मळमळू लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस यांनी तपास केला असता रुग्णालयात दाखल असलेल्या १९ वर्षीय तरुणाने शीतपेयात विष मसाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
06 Jul 2025 11:35 AM (IST)
नवी मुंबईत एक काळ्या जादूचा विचित्र प्रक्रर समोर आला आहे. या व्यक्तीने अंधश्रदेच्यापोटी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एका व्यक्तीने आपलू पत्नी आणि सासूला निर्वस्त्र होण्यास सांगितले. हा टोटक्याचा भाग असल्याचे त्यांना सांगितले. त्यांची अश्लील फोटो काढले. त्यानंतर त्याने आपली पत्नी आणि सासू यांना ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की तू जर माझं ऐकलं नाही तर मी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करेल अशी धमकी दिली. त्याने हे फोटो पत्नीच्या वडिलांना आणि भावाला पाठवले. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दखल होता आरोपी फरार झाला.
06 Jul 2025 11:34 AM (IST)
सातारा शहरांमध्ये सातत्याने वेगवेगळे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सातारा शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. अविनाश राजाराम भिसे (वय २५, रा. प्रतापसिंहनगर), रोहित जितेंद्र भोसले (वय २२, रा. प्रतापसिंहनगर) अशी दोघांची नावे आहेत. हद्दपार प्राधिकरणाचे प्रमुख पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी हे आदेश दिले.
06 Jul 2025 11:02 AM (IST)
वाल्हे (ता. पुरंदर) येथे जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी गणेश जगन्नाथ भुजबळ (रा. वरचा मळा, वाल्हे, ता. पुरंदर) याने दोघांवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी आरोपी गणेश भुजबळ याला अटक केली आहे.