Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

रेल्वे प्रवासी महिलेला मदतीचा बहाणा करून तिच्या बॅगेतील सोन्याच्या बांगड्या, अंगठी चोरून पसार झालेल्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 20, 2025 | 12:30 AM
महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्याजह देभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे वेगवेगळ्या भागात नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक चोरीसंदर्भात बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवासी महिलेला मदतीचा बहाणा करून तिच्या बॅगेतील सोन्याच्या बांगड्या, अंगठी चोरून पसार झालेल्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. चोरट्याचे पुणे आणि मिरज रेल्वे स्थानकात प्रवाशांकडील ऐवज चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून ११० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

रमेश उर्फ मोटा पिता फूलचंद (रा. न्यू अनाज मंडी, नजफगड, दिल्ली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहायक निरीक्षक प्रभाकर कापुरे, उपनिरीक्षक सुनील माने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

तक्रारदार महिला बडोदा-पुणे या मार्गावर रेल्वेने प्रवास करत होत्या. पुणे रेल्वे स्थानकाजवळ गाडी आल्याने महिला खडकी जवळ येऊन थांबली होती. तिच्याकडे बॅग होती. तेव्हा चोरटा रमेश आधीच डब्यात होता. त्याने प्रवासी महिलेला दरवाज्यापर्यत बॅग ठेवतो, असे सांगितले. महिलेला मदतीचा बहाणा केला. मात्र, त्याने बॅगेतून ५२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, तसेच एक ग्रॅम वजनाची लहान मुलांची अंगठी असा ऐवज लांबविला. बॅगेतून ऐवज चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पुणे लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या.

पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा रमेश आणि त्याच्याबरोबर असलेल्या चार साथीदारांनी बॅगेतून ऐवज चोरल्याचे उघडकीस आले. रमेश दिल्लीत असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. दिल्ली पोलिसांच्या मदतीने आरोपी रमेशला पकडले. चौकशीत त्याने मिरज रेल्वे स्थानकात प्रवासी महिलेला मदत करण्याचा बहाणा करुन ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडून ११० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले.

Web Title: Pune police arrests thief from delhi for stealing womans jewellery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Theft Case

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
1

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ
2

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
3

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
4

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.