Crime News Live Updates
आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका कीर्तनकार महिला सहभागी असल्याचे समोर आले असून, पीडितेने पाच जणांविरुद्ध बलात्कार, अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तसेच सखल मराठा समाजाकडून आळंदी पोलीस ठाण्यात पत्र देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
14 Jul 2025 05:31 PM (IST)
खेड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील खालूंब्रे परिसरात सोमवारी (दि. १४) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कामावर जाण्यासाठी लिफ्ट घेतलेल्या तरुणाचा हा प्रवास दुर्दैवाने अखेरचा ठरला आहे. गजानन बाबुराव बोलकेकर (वय २६, रा. नांदेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर आदित्य गजाननराव गायकवाड (वय २३, रा. येलवाडी, ता. खेड) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची नोंद महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विजय शंकरराव तंतरपाले (वय २४, रा. चाकण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोहम्मद अरमान कमरुद्दीन खान (वय ३०, रा. धारावी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.
14 Jul 2025 05:15 PM (IST)
सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शासकीय कामकाजाच्या वेळीच मद्यधुंद अवस्थेत असताना चारचाकी गाडी बेदरकारपणे चालवून एका दुचाकीस जोरदार धडक दिली. तसेच धडक दिल्यानंतर काही अंतर फरफटत नेहून तिथेच जखमी व्यक्तीला सोडून पळ काढला होता. यातील जखमी व्यक्तीचे निधन झाल्यानंतर चालक पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वास्तविक पाहता या संपूर्ण प्रक्रियेत खूप वेळ गेल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन झाले आहे. योगेश गरुड असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
14 Jul 2025 04:56 PM (IST)
लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध निर्माण करणे तसेच आर्थिक पैसे घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. नऊ वर्षांपासून असलेले संबंध व नंतर आरोपीने दुसऱ्या मुलीशी विवाह केल्यावरून ही तक्रार देण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. गोविंद पाराजी होगे (वय ३१) असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे.
14 Jul 2025 04:15 PM (IST)
ठाणे : ५० हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन भामट्यांनी एका महिलेची फसवणूक केली. त्या महिलेला लहान मुलांच्या खेळण्यातील पैसे देण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, जादा पैशांसाठी तिने दागिने विकून त्या भामट्यांना पैसे गोळाकरून दिले होते.
14 Jul 2025 04:00 PM (IST)
पिंपरी- चिंचवडमध्ये त्याआधी दुसऱ्या दोन चोरट्यानी मंदिराच्या बाहेर असलेल्या नंदीच दर्शन घेतलं, मग दानपेटीतील पैसे काढलेत. बनावट चावी वापरून दानपेटीमधील पैसे घेऊन अज्ञात तिघे चोरटे फरार झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. 1अज्ञात तीन चोरट्यांनी महादेव मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला आहे. ही सपुर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चऱ्होली येथील वरमुखवाडी परिसरात असलेल्या साई मंदिराच्या आवारात हे मंदिर आहे. शनिवारी दुपारी हे चोरटे मंदिरात शिरले होते. यातील एक चोरटा महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन दानपेटीतील पैसे काढताना सीसीटीव्हीत दिसतोय.
14 Jul 2025 03:51 PM (IST)
परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे दोन गट आमनेसामने आल्याने शनिवारी रात्री हाणामारीची घटना घडली आहे. बॅनर लावल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद हाणामारीत बदलला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली, काठ्या आणि कुऱ्हाडीने हल्ला चढवला. या हिंसक झटापटीत पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
14 Jul 2025 03:49 PM (IST)
राज्यातील महानगरांपैकी एक असलेली मुंबई आणि प्रगतीची कास धरलेल्या नागपूरच्या तुलनेत पुणे शहर पोलिस दलाच्या मनुष्यबळाकडे पाहिल्यानंतर हा दुजाभाव नाही का? असा प्रश्न प्रत्येक पुणेकराला पडतो. पुणे पोलिस दलात लोकसंख्येनुसार २१ हजार पोलिस आवश्यक असताना सद्य स्थितीत १० हजारपर्यंत पोलिस बळ पोहचले आहे. राज्यासह देशातील महत्त्वाच्या शहरांतील पोलिस दलाचे मनुष्यबळ पाहिल्यानंतर हे भयावह वास्तव स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे पुणे पोलिसांवर आणि एकूणच पुणेकरांवर दुजाभाव झाला? असेच म्हणावे लागेल. तो कोणी केला, याकडे न पाहता आता वाढणाऱ्या शहरातील पोलिसांना अधिक सक्षम बनविण्यासाठी आता तरी त्याकडे गांर्भियाने पाहणे गरजेचे आहे.
14 Jul 2025 03:26 PM (IST)
लखनऊमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पीडितांनी चांगूर बाबाच्या कारनामाचा पर्दाफाश केला आहे. एका तरुणीने सांगितले की, तिला बनावट नावाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला सौदी अरेबियात नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते, परंतु तिथे खरे वास्तव उघड झाले. आरोपी राजू राठोडचे खरे नाव रशीद होते. त्याने फसवणूक करून त्यांचे धर्मांतर केले. पीडितांनी सांगितले की, चांगूर बाबा इस्लामचा प्रचार करण्याबद्दल बोलत असे.
14 Jul 2025 03:00 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुरुड तालुक्यातील फणसाड डॅममध्ये एक तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या अंधेरी येथून ११ युवक तिथे फिरायला गेले. तेव्हा एकाच पोहताना मृत्यू झाला. मृतकाचे नाम साहिल राजू रणदिवे असं बुडालेल्या तरुणाचा नाव असून तो २४ वर्षाचा आहे. ही घटना मुरुडमधील बोरली गावाच्या हद्दीत घडली.
14 Jul 2025 02:30 PM (IST)
सोलापूरच्या कुमठे गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या गावातील एका तलावात बुडून तेरा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृत्यूच्या घटनेनंतर कुटुंबियांसह कुमठे गावात एकच शोककळा पसरली आहे. बाळाच्या आई वडिलांनी त्याचा अंत्यसंस्कार करून बाळाला पुरलंय. मात्र बाळाच्या मामला या घटनेवर संशय आला आणि त्याने पोलिसांकडे तक्रार करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
14 Jul 2025 02:07 PM (IST)
स्मार्टफोन कंपनी Nokia त्यांचा पहिला ट्रांसपरंट स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. त्यामुळे सगळेजण अगदी आतुरतेने Nokia च्या ट्रांसपरंट स्मार्टफोनची वाट बघत होते. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, खरंच लाँच होणार का, त्याचे स्पेसिफिकेशन्स कसे असणार, कॅमेरा कसा असणार याबाबत कंपनीने अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केली नाही. कंपनीचा ट्रांसपरंट स्मार्टफोन खरंच लाँच केला जाणार आहे का, याबाबत देखील अद्याप कोणतीही अपडेट शेअर करण्यात आली नाही. मात्र, अशातच आता सोशल मीडियावर अनेक पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
14 Jul 2025 01:40 PM (IST)
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यातील सुरू असलेला वाद आता कायदेशीर आघाडीवरही तीव्र होत चालला आहे. आलोक मौर्य यांनी त्यांच्या पत्नीकडून पोटगी मिळविण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेची दखल घेत, उच्च न्यायालयाने ज्योती मौर्य यांना नोटीस बजावली आहे आणि अपीलची प्रत नोंदणीकृत पोस्टाने पाठविण्याचे आदेशही दिले आहेत. स्वच्छता कर्मचारी आलोक कुमार मौर्य यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती अरिंदम सिन्हा आणि डॉ. योगेंद्र कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी निश्चित केली. हे प्रकरण आता पती-पत्नीमधील वैयक्तिक संबंधांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर सामाजिक, नैतिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातूनही चर्चेचा विषय बनले आहे. संपूर्ण देश या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची आतुरतेने वाट पाहत आहे.
14 Jul 2025 01:07 PM (IST)
अमरावती शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमरावती येथील शंकरनगर परिसरात एका हॉटेलमध्ये तरुणाईची मद्यपार्टी सुरु होती. शंबर ते दीडशे तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये अधिक अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश आहे. हॉटेल मध्ये फेक मॅरेज इव्हेंटचा 5 दिवसीय आयोजन करून इथे अल्पवयीनाना मद्य सर्व करण्यात येत होते. ही कारवाई 13 जुलैला रात्री नऊच्या सुमारास हॉटेलमध्ये गुन्हे शाखा युनिट 2 ने केली आहे.
14 Jul 2025 12:25 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पिल्यानंतर बिल न देताच निघून जाणाऱ्या तरूणाच्या घरी हॉटेल कामगारांनी फोन करून बिलाची माहिती दिली. नंतर मात्र तरुणाने घरी का सांगितले याचा राग मनात धरत त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा हॉटेलमध्ये येऊन सुरक्षा रक्षकावर धारदार हत्याराने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील भोसले (रा. सातववाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत राहुल शैलेश यादव (२७, रा. १५ नंबर, टेकडे पेट्रोल पंपवाजवळ, सम्राट हॉटेल, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुळचे उत्तरप्रदेश येथील रहिवासी असून सध्या ते हडपसर येथील १५ नंबर परिसरात राहतात. तेथेच असलेल्या सम्राट हॉटेलमध्ये ते सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतात.
14 Jul 2025 11:57 AM (IST)
नागपुरातील माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडीची तस्करी करताना पोलिसांनी अटक केली आहे.माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार याला एमडी तस्करी करताना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांना त्याच्याकडून 16.07 ग्राम एमडी पावडर आढळली असून जवळपास 1.67 लाख रुपयाच्या एमडी पावडरसह 18.17 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
14 Jul 2025 11:54 AM (IST)
चांदोरी- निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे शिवारात रविवारी (ता. १३) मध्यरात्री सशस्त्र चोरट्यांच्या टोळीने चार वस्त्यांवर एकाच रात्री धाडसी घरफोडी करीत शेतशिवारात खळबळ उडवून दिली. रात्री साडेबारा ते तीनच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी महिलांच्या अंगावरील दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल लुटले, तर महिलांना धमकावत पुरुषांना बेदम मारहाण केली.
14 Jul 2025 11:51 AM (IST)
पुण्यात एका तरुणाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कात्रज परिसरात ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली. मयत तरुण पान खाण्यासाठी पानटपरीवर गेला होता. तिथेच वाद झाला आणि एकाने थेट कोयताच त्याच्या डोक्यात मारला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
14 Jul 2025 11:45 AM (IST)
बांगलादेशमधून कामाच्या निमित्ताने भारतात आणलेल्या एका अल्पवयीन मुलीला पुण्यातील बुधावर पेठेत जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिला ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र, नंतर दलाल व्यक्तींनी तिला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात ठेवले. तसेच, वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीही केली. नकार दिल्यानंतर या तरुणीला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. एका सामाजिक संस्थेने हा प्रकार समोर आणत पोलिसांच्या मदतीने तरुणीची सुटका केली आहे.