Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naigaon 1000 CR Land Scam: १,००० कोटींचा जमीन घोटाळा उघड: दिग्गज बांधकाम व्यावसायिकांसह महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

'धनश्री डेव्हलपर्स प्रा. लि.'चे संचालक आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शंकरराव अंबऋषी बोरकर (६६) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 05, 2026 | 04:27 PM
Naigaon Land Scam, नायगाव जमीन घोटाळा, ₹1,000 Crore Fraud Case,

Naigaon Land Scam, नायगाव जमीन घोटाळा, ₹1,000 Crore Fraud Case,

Follow Us
Follow Us:
  • १,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या जमिनीचा घोटाळा उघडकीस
  • महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल
  • ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नायगाव पोलीस ठाण्यात हेमंत पाटील, धर्मेश शहा, दिपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल
Naigaon Crime News: पालघर जिल्ह्यातील टिवरी परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तब्बल १,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या जमिनीचा घोटाळा उघडकीस आला असून, याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात मुख्य आरोपींसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमकी घटना काय?

‘धनश्री डेव्हलपर्स प्रा. लि.’चे संचालक आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शंकरराव अंबऋषी बोरकर (६६) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, २००८ पासून आरोपी हेमंत पाटील आणि धर्मेश शहा यांनी त्यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र, नायगाव (पूर्व) येथील मौजे टिवरी येथील ६५.३३ एकर जमिनीबाबत बनावट कागदपत्रे तयार करून ती बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ४,००० रुपये खात्यात जमा होणार, कसं ते जाणून घ्या…

घोटाळ्याची पद्धत (Modus Operandi)

तक्रारीत नमूद केल्यानुसार, जमिनीचे रितसर ७/१२ उतारे, नोंदणीकृत खरेदीखत आणि साठेकरार अस्तित्वात होते. कालबाह्य आणि रद्द झालेल्या ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’चा वापर करण्यात आला. बिगर-नोंदणीकृत (Non-registered) कागदपत्रांच्या आधारे अनेक सर्व्हे नंबरच्या जमिनी परस्पर विकल्या गेल्या. फिर्यादींच्या संमतीशिवाय DDPL Global Pvt. Ltd. आणि Unicorn Inca & Estate Pvt. Ltd. या कंपन्यांच्या नावावर जमिनीची खोटी नोंदणी करण्यात आली.

Nashik Politics: निष्ठावंतांपासून, ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच नाराज; मग भाजपमध्ये आनंदी तरी कोण?

महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग?

या मोठ्या घोटाळ्यात केवळ खाजगी व्यक्तीच नव्हे, तर सरकारी यंत्रणेवरही ठपका ठेवण्यात आला आहे. वसई-२ निबंधक कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, तहसीलदार आणि तलाठ्यांनी महसुली नियमांचे उल्लंघन करून आरोपींना मदत केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलीस कारवाई आणि तपास

याप्रकरणी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नायगाव पोलीस ठाण्यात हेमंत पाटील, धर्मेश शहा, दिपक खोचरे, मच्छिंद्र भोईर आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत कलम ३१८(४), ३१६(२), ३३८ आणि ३४ नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने आगामी काळात अनेक बड्या हस्तींचे धाबे दणाणले आहेत.

 

Web Title: Land scam worth 1000 crore unearthed in naigaon cases filed against prominent builders and revenue officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • Palghar crime news

संबंधित बातम्या

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
1

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या
2

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
3

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी
4

Raigad News: रोह्यात हेल्मेट सक्तीवर नागरिकांचा संताप; ‘सामान्यांऐवजी बेदरकार वाहनचालकांवर कारवाई करा’, स्थानिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.