Crime News Live Updates
पोलिस खात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. धाराशिव येथील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे याने बीडच्या एका विवाहित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेच्या तक्रारीनंतर खळबळ उडाली आहे.
24 Jul 2025 05:37 PM (IST)
Health News: आपण आपल्या रोजच्या आहारात अनेक पदार्थांचा समावेश करत असतो. रोजचे पदार्थ तयार करताना असताना त्यात काही मसाले, किंवा काही पदार्थ मिसळणे हे अत्यंत महत्वाचे असते. तसेच आपल्या रोजच्या जेवणात कांदा आणि लसूण या दोन गोष्टींचा समावेश असतो. भारतीय जेवणांमध्ये यांचे महत्वाचे स्थान आहे. याशिवाय जेवण करणे ही कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. भाजी, वरण, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये याचा समावेश केला आहे. कांदा आणि लसणाचे फायदे देखील आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
24 Jul 2025 04:42 PM (IST)
सातारा जिल्ह्यातील कराडमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे . आकाडी जेवणाच्या कार्यक्रमात आईसोबत गेलेल्या अवघ्या 4.5 वर्षांच्या मुलीवर 18 वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे . याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी तरुणाला तातडीने अटक केली असून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
24 Jul 2025 04:40 PM (IST)
राज्यात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, पेठ (ता. आंबेगाव) येथे बुधवार, दिनांक २३ जुलै रोजी दुपारी भरदिवसा बँकेतून पैसे काढून घरी जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
24 Jul 2025 04:10 PM (IST)
मराठी अमराठीचा वाद आता नवी मुंबईतील महाविद्यालयापर्यंत पोहचला आहे.. भाषेच्या वादातून एका वीस वर्षीय विद्यार्थ्याला हॉकी स्टीकने गंभीर मारहाण करण्यात आली होती.मराठी विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या अमराठी तरुणांवर त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अश्या पद्धतीने कारवाई करण्याची मागणी मनसे नेते गजानन काळे यांनी केली आहे.
24 Jul 2025 04:03 PM (IST)
कल्याणमध्ये ऑनलाइन जुगारामुळे तरुण कर्जबाजारी झाला. या तरुणाने धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिल्या प्रवाशांचे दागिने लुटण्याचे काम सुरु केले. लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशी बसली की स्टेशन येताच महिलांच्या गळ्यातील महागडे दागिने हिसकावून उलट्या दिशेने उडी टाकून हा तरुण पळून जायचा. अखेर कल्याण जीआरपी पोलिसांनी ऋषिकेश बेनके नावाच्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहे. ऋषिकेश याने आणखीन काही गु्हे केले आहेत का ? याचा तपास सुरु आहे.
24 Jul 2025 03:22 PM (IST)
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून काही अंतरावर असलेला हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी दोन मित्र गेले होते. परंतु वाटेत त्यांचा भीषण अपघात झाला आणि जागीच मृत्यू झाला. पंकज दातीर आणि अभिषेक अशी मृतकांची नावे आहे. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
24 Jul 2025 03:05 PM (IST)
कोथरुड भागातील गुरू गणेश नगर येथील मधुकुंज सोसायटीत १४ वर्षीय मुलावर जुन्या भांडणाच्या रागातून धारदार हत्याराने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन तरुणांसह एका अल्पवयीन आरोपीवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून अर्जुन धोत्रे (वय १९, रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरुड), पवन वाणी (वय १८) आणि एका अल्पवयीन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह, आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 Jul 2025 02:52 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारूच्या बिलाच्या एकूण रकमेपेक्षा दहा रुपये कमी दिल्याच्या कारणावरून ग्राहकाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच ग्राहकाच्या डोक्यात बिअरच्या बाटलीही फोडली आहे. ही घटना नवले पुलाजवळील चैतन्य बारमध्ये घडली आहे. याप्रकरणी तीन बार कर्मचाऱ्यांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नऱ्हे येथील मानाजीनगर येथे राहणाऱ्या तरुणाने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे.
24 Jul 2025 01:46 PM (IST)
धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री आणि त्याचे मालक सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. सोशल मीडियावर सतत चर्चेत ते असतात. आता हॉटेल भाग्यश्रीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी स्वत: आपबिती सांगितली आहे.
24 Jul 2025 01:26 PM (IST)
कोल्हापुरात एका ठेकेदाराने महानगरपालिकेला लाखोंचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्ष काम न करता कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून ठेकेदारानं ८५ लाखाचं बिल मिळवल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराने देखील आपण खोट्या सह्या आणि कागदपत्रांचा वापर करून हे बिल मिळवलं असल्याच कबुल केलं आहे. या प्रकारामुळे मात्र महानगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
24 Jul 2025 01:25 PM (IST)
थायलंड आणि कंबोडियात पुन्हा एकदा सीमावादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान या वादाने तीव्र रुप धारण केले आहे. गुरुवारी (२४ जुलै) सीमेवर जोरदार गोळीबार झाला. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये चकामक झाला. यामध्ये दोन्ही देश एकमेकांवर आधी हल्ला केल्याचा आरोप करत आहे. दोन्ही देशांच्या चकामकीत दोन थाई सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही देशांतील सीमावदा तीव्र वाढत चालला आहे.
24 Jul 2025 01:08 PM (IST)
पुणे जिल्ह्यातील केडगाव चौफुला जवळील 'न्यू अंबिका कला केंद्रात' भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह आलेल्या चौघांपैकी एकाने हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोळीबाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व इतर एक अशा चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत कला केंद्राचे मॅनेजर बाबासाहेब राजश्री अंधारे यांनी तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी (द. २१ जुलै) रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास झाला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.
24 Jul 2025 12:30 PM (IST)
धाराशिवमध्ये रक्षकच भक्षक बनल्याचे समोर आले आहे. धाराशीव येथील एका पोलीस निरीक्षकाने पिस्तुलाचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिला ही मूळ बीडची आहे. बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेच्या तक्रारीनंतर खळबळ उडाली आहे.
24 Jul 2025 12:25 PM (IST)
नवी मुंबई येथून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या २२ वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून त्याच्या प्रेयसीच्या नवऱ्याचा डोक्यात फावडा घालून निर्घृण हत्या केली. ही घटना वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दाम्पत्याला २ मुले देखील आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
24 Jul 2025 12:20 PM (IST)
नांदेड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी आप आपल्या मित्रासह लॉजवर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात असलेल्या एका तरुणीच्या भावला कुणकुण लागली. तरुणीचा भाऊ थेट लॉजवर पोहोचला आणि तिला रंगेहाथ पकडले आणि मोठा राडा झाला. ही घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका गावात घडली. राडा करणारा तरुणीचा भाऊ अल्पवयीन असून तो त्याच्या दोन मित्रांसोबत तो तिथे गेला होता. पोलिसांनी या प्रकणी जिवे मारण्याचा प्रयत्न अन् अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
24 Jul 2025 12:14 PM (IST)
डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला हाताची नस कापण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. तिला धमकी देत प्रेमाची मागणी केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करून संबंधित तरुणाला अटक केली आहे.