Maharashtra Crime News Live Update
समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरवर डोणगाव जवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणारी कार ट्रकला धडकल्याने कारचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार चालकाला डूलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे समोर आलं आहे.
03 Jun 2025 06:21 PM (IST)
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ५१ कोटी ९४ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणात एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली असून, ही यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
03 Jun 2025 05:57 PM (IST)
पुणे शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना वाघोली पोलिसांना सोन साखळी चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. दरम्यान, पाच जणांची टोळी असल्याचे समोर आले असून, ते दुचाकी चोरून त्या दुचाकीवर सोन साखळी चोरत असल्याचे समोर आले आहे. तर, यातील एक नाशिक पोलिसांना ३ गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी असल्याचेही समोर आले आहे.
03 Jun 2025 03:52 PM (IST)
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान आज कोर्टात सुनावणी पार पडली. सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तिवाद पार पडला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी, असे उज्वल निकम यांनी कोर्टाला सांगितले. दरम्यान वाल्मीक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. सरकारी पक्षाने अजून डिजिटल पुरावे सादर झाले नसल्याचे वाल्मीक कराडच्या वकिलांनी सांगितले. यावर आता 17 जून रोजी कोर्टात पूढील सुनावणी होणार आहे. आज कोर्टात जवळपास एक तास सुनावणी पार पडली. आज डिस्चार्ज अर्जावर सुनावणी होणे अपेक्षित होते, त्यावर आज सुनावणी झाली नसल्याचे समजते आहे. आज किरकोळ अर्जावर दोन्ही बाजूनचे म्हणणे ऐकले गेले. या खटल्यातून आणि मकोकामधून मला दोषमुक्त करावे असा अर्ज वाल्मीक कराडने कोर्टसमोर केला आहे. यावर 17 तारखेला सुनावणी होणार आहे. केवळ वाल्मीक कराडने दोषमुक्तीचा अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 17 तारखेला होणाऱ्या सुनावणीत कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
03 Jun 2025 02:22 PM (IST)
बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या अडचणी वाढल्या आहे. रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आयटी सेलचे प्रदेश सहसंयोजक संभाजी सुर्वे यांच्या तक्रारीवरून सायबर विभागाने हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रणजित कासले याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित सोशल मीडियाच्या माध्यमात बदनामीकारक आणि आक्षेपार्य विधान केल्याची तक्रार नोंदवली गेली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या बीएनएस नुसार कलम 197, 353(2) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, कलम 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. परिणामी रणजीत कासलेच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार असल्याचे बोललं जात आहे.
03 Jun 2025 01:26 PM (IST)
एका १८ वर्षीय तरुणीने आईला मेसेज करून लवकर घरी येत असल्याचं कळवलं परंतु ती घरी परतलीच नाही. तिची हत्या झाल्याचं समोर आला आहे. तिच्या मित्रानेच ही हत्या केल्याचं तपासात उघड केला आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील संजय वन परिसरात घडली आहे. या हत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही आहे. आरोपीचं नाव अर्शकृत सिंग (१८ वर्षीय) असं आहे. त्याने ही हत्या का केली अद्याप समजू शकलेले नाही आहे.
03 Jun 2025 01:00 PM (IST)
मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात असणाऱ्या आर सिटी मॉलमध्ये सोमवारी सकाळी एका व्यक्तीने आत्महत्या केली. तो मॉल फिरायला गेला आणि अचानक तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली. मृत व्यक्तीचे नाव दीपक जोशी (वय ३८) असे होते. या घटनेननंतर पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून दिपकचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेनंतर एकाच खळबळ उडाली आहे.
03 Jun 2025 12:44 PM (IST)
एका १८ वर्षीय तरुणीने आईला मेसेज करून लवकर घरी येत असल्याचं कळवलं परंतु ती घरी परतलीच नाही. तिची हत्या झाल्याचं समोर आला आहे. तिच्या मित्रानेच ही हत्या केल्याचं तपासात उघड केला आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील संजय वन परिसरात घडली आहे. या हत्येमागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही आहे. आरोपीचं नाव अर्शकृत सिंग (१८ वर्षीय) असं आहे. त्याने ही हत्या का केली अद्याप समजू शकलेले नाही आहे.
03 Jun 2025 12:43 PM (IST)
विरुद्ध दिशेने आलेल्या (राँग साईड) भरधाव डंपरने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येरवडा भागातील शास्त्रीनगर ते गुंजन चित्रपटगृह रस्त्यावर रविवारी हा अपघात घडला आहे. याप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर आलमयार खान (वय ३१, रा. निओ सिटी, बकोरी फाटा, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक अमिल रामसिरीठ सिंग (वय ४६, रा. शास्त्रीनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आत्ता यार खान (वय ३४, रा. निओ सिटी, बकोरी फाटा, वाघोली, नगर रस्ता) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
03 Jun 2025 12:32 PM (IST)
भवानी पेठेतील एका सोसायटी
03 Jun 2025 12:06 PM (IST)
कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना वाटेत झालेल्या मटण बिर्याणीच्या पार्टीवेळी त्याला पैशांसह विविध प्रकारची मदत करणाऱ्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी हा आदेश दिला आहे. विशाल विलास धुमाळ (वय ३८, रा. राजेंद्र नगर) असे पोलीस कोठडी वाढविलेल्या आरोपीचे नाव आहे.
03 Jun 2025 12:05 PM (IST)
एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतर पैसे निघत नसल्याची बतावणी करून त्यांचे एटीएम कार्ड आदला-बदली करून रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा खडकी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुण्यात टोळीने अनेक ठिकाणी एटीएम कार्ड बदलाबदल करुन नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. हे चोरटे चोरी करण्यासाठी विमानाने पुण्यात येत होते. सावेज सलीम अली (वय ३०, रा. लोणी गाझियाबाद, उत्तर प्रदेश), नियाज इजाज मोहम्मद (वय २९, रा. लोणी गाजियाबाद) अशी या चोरट्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले व त्यांच्या पथकाने केली आहे.
03 Jun 2025 11:41 AM (IST)
जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील सोनटक्के प्लॉट येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेने गुरुवारी (दि. 29) तिच्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील लोकांच्या मदतीने कुटुंबीयांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेला. मिळालेल्या माहितीनुसार, राणी परवीन (वय 19) या विवाहित महिलेने घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती व सासूला अटक केली आहे.