मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाने विशेष तपास पथक गठित करण्याचा निर्णय घेतला आहे.