राहुल गांधी यांची केजरीवाल यांचीवर टीका (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: दिल्ली विधनसभेची निवडणूक जवळ आली आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान इंडिया आघाडीमध्ये एकत्रित असलेले आणि नंतर वेगळे झालेले कॉँग्रेस आणि आम आदमी पक्ष आमने-सामने लढत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी बोलताना म्हणाले, “आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘वॅगनआर’ गाडीने राजकारणात आले आणि ‘शीशमहल’च्या पार्किंगमध्ये गेले. राहुल गांधी दिल्लीच्या मादीपूरमध्ये राहुल गांधी यांनी प्रचार सभेला संबोधित केले.
राहुल गांधी म्हणाले, “केजरीवाल आणि नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात खोटे बोलते. मे अशीच वचने देतो जी मी पूर्ण करू शकतो. आम्ही मनरेगा योजना, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, दिल्लीत फ्लायओवर बांधले, विकासकामे केली. पण खोटी वचने दिली नाहीत. ” विरोधकांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाला शीशमहल असे नाव दिल्याचे म्हटले जाते. केजरीवाल यांनी त्यांच्या घराच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप केला जातो. केजरीवाल फक्त खोटी आश्वासने देतात असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
हेही वाचा: Arvind Kejriwal: “…ते कधी हिंमत करणारही नाहीत”; संदीप दिक्षितांचे केजरीवालांना खुले आव्हान
संदीप दिक्षितांचे केजरीवालांना खुले आव्हान
दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. कॉँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्लीची निवडणूक स्वबळावर लढत आहेत. दरम्यान निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसे आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कॉँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
दिल्ली विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नवी दिल्ली मतदारसंघाचे कॉँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी केजरीवालांना खुले आव्हान दिले आहे. 31 जानेवारी रोजी जंतर-मंतर मैदानावर सार्वजनिकरीत्या चर्चेचे आव्हान दिले आहे. संदीप दीक्षित यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. संदीप दीक्षित हे कॉँग्रेसचे नवी दिल्लीचे उमेदवार आहेत.
यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य भोवलं; केजरीवालांच्या अडचणी वाढल्या
दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. 5 तारखेला मतदान आणि 8 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मात्र माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होताना पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात सोनीपत कोर्टाने केजरीवाल यांना नोटिस धाडली आहे.