बेरोजगारीपोटी चोरी करायला शिरला फ्लॅटमध्ये, सुटला स्वतःवरचा ताबा मौल्यवान वस्तूऐवजी घेतले महिलेचे चुंबन (फोटो सौजन्य-X)
Mumbai Crime News Marathi : मुंबई उपनगरातील मालाडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरट्याला कोणतीही मौल्यवान वस्तू न सापडल्याने आरोपीने घरातील महिलेचा मुका घेऊन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपीलाही अटक करण्यात आली.
कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या मालाडमधील कुरार भागात एक अजब चोरीची घटना घडलीय. चोरट्यानं मुद्देमाल नसून, थेट महिलेचा मुका घेऊन पळ काढला आहे. ३ जानेवारीला आरोपीविरोधात विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली चोरट्याला अटक केली असून, घरात किमती मुद्देमाल न सापडल्याने त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
कुरार पोलिस स्टेशनने सांगितले की, विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ३ जानेवारीला आरोपीविरोधात विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली चोरट्याला अटक केली असून, घरात किमती मुद्देमाल न सापडल्याने त्याने हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिला घरी एकटीच होती तेव्हा आरोपीने घरात प्रवेश करून दरवाजा आतून बंद केला. यानंतर आरोपीने महिलेला गंडा घातला आणि तिला सर्व मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड देण्यास सांगितले. मात्र महिलेने घरात मौल्यवान वस्तू नसल्याचे सांगताच आरोपीने महिलेचा मुका घेतला आणि तिथून पळ काढला.. या महिलेने नंतर कुरार पोलीस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनंतर सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी हा त्याच भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, त्याचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि सध्या बेरोजगार आहे.
पत्नीची चाकूने हत्या करून ३२ वर्षीय व्यक्तीने पोलीस ठाणे गाठल्याचा प्रकार मालाड परिसरातून समोर आला. हत्येसाठी वापरलेला चाकू तात्काळ जप्त केला तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी सोमवारी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृत महिलेच्या पाठीवर, मानेवर व गळ्यावर गंभीर जखमा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नितीन धोंडीराम जांभळे (३२) असे अटक आरोपीचे नाव असून तो मालाड पूर्व येथील कासमबाग परिसरातील रहिवासी आहे. कोमल (२५) असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. मृत महिला व आरोपी नितीन यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. पण कुटुंबियांना लग्न मान्य नसल्यामुळे ते वेगळे राहत होते. त्यातून गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. आरोपी कोमलच्या चारित्र्यावरून संशय घ्यायचा. पीडित महिलेचे वडील मालाड पूर्व येथील रहिवासी आहे.