Photo Credit- Social Media बंधु धनंजय देशमुख न्यायालयातील याचिका मागे घेणार
Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्या जवळपास सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सीआयडीकडून या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरू आहे. आतापर्यंत तीन मुख्य संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात या प्रकरणामुळे वातावरण तापलं आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनीदेखील हे प्रकरण उचलून धरलं आहे. सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेंवर आरोप केल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
या सगळ्यात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी धनंजय देशमुख यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय धनंजय देशमुख यांनी घेतला आहे.
संतोष देशमुख यांच्य हत्येची दाद मागण्यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या माध्यमातून त्यांनी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आणि मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीआधी त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे. ‘आम्ही सध्या सुरू असलेल्या सीआयडीच्या तपासावर समाधानी आहोत. यामुळे ही याचिका वकीलामार्फत मागे घेतली आहे. गरज भासल्यास आम्ही भविष्यात पुन्हा याचिका दाखल करू,’ असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ट्विट करुन वाल्मिक कराडच्या वाईन शॉपचा तपशील देत आरोप केले आहेत. खंडणीसाठीच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. दुसरीकडे वाल्मिक कराडला अनेकांनी समाज सुधारक असे संबोधल्यानंतर दमानिया यांनी वाल्मिक कराडचे चार-पाच वाईन शॉप असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये काही पुरावेही सादर केले आहेत. बीडमधील केज, वडवनी, परळीमध्ये वाल्मिक कराडचे चार-पाच वाईन शॉप असून प्रत्येक वाईन शॉपचा बाजारभाव पाच कोटी असल्याचा दावा केला आहे.
Delhi Assembly Election 2025: निवडणुकांची घोषणा होताच केजरीवालांनी
संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यांची हत्या कशी झाली, याबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सुरेश धस म्हणाले,” 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपी विष्णु चाटेला 36 कॉल केले. 35 कॉलपर्यंत धनंजय देशमुख यांनी विष्णु चाटेला आपल्या भावाला सोडण्याासाठी विनंती केली. प्रत्येक वेळी त्याने 20 मिनिटात तुझ्या भावाला पाठवतो, असं चाटे सांगत होता. धनंजय देशमुख यांना 35 वेळा झालेल्या कॉलवर विष्णु चाटेने हेच सांगितलं. पण 36व्या कॉलला त्याने संतोष देशमुख यांचा मृतदेहच पाठवला.