Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बलात्कार प्रकरणी मल्याळम अभिनेता दिलीपची निर्दोष सुटका, तर सहा आरोपी दोषी; २०१७ च्या प्रकरणात केरळ न्यायालयाचा निकाल

२०१७ मध्ये दक्षिणात्य अभिनेत्रीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार प्रकरणात ८ वर्षानंतर मोठा निकाल. एर्नाकुलम कोर्टाने अभिनेता दिलीपला पुरावे अपुरे असल्याने निर्दोष मुक्त केले, तर मुख्य आरोपीसह ६ जण दोषी ठरले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 08, 2025 | 12:56 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • २०१७ मध्ये अभिनेत्रीचे अपहरण व चालत्या कारमध्ये अत्याचार
  • पल्सर सुनी व साथीदारांनी घटना रेकॉर्ड केल्याचे आरोप
  • ८ वर्षे सुरू असलेल्या खटल्यात अभिनेता दिलीप निर्दोष
२०१७ मध्ये दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक हादरवणारा प्रकार घडला होता. एका अभिनेत्रीचा अपहरण करून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु होती. ८ वर्षाच्या कालावधीनंतर आज (सोमवारी) याला एक मोठा वळण आला आहे. एर्नाकुलम प्रिंसिपल सेशंस कोर्टने अभिनेता दिलीपला क्लीन चिट दिल्याचे समोर आले आहे. त्यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले. तर या प्रकरणी सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. आठ वर्षांपासून हा खटला सुरु होता. कायदेशीर लढाईनंतर आणि शेकडो साक्षीदारांनंतर हा निकाल देण्यात आला.

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी निलंबीत

नेमकं प्रकरण काय?

१७ फेब्रुवारी २०१७ला मुख्य आरोपी पल्सर सुनी आणि त्याच्या साथीदारांनी रात्री अभिनेत्रीचे तिच्या कारमध्ये घुसून अपहरण केले. त्यानंतर चालत्या गाडीत तिच्यावर हल्ला करत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर, आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील काढले. याप्रकरणी न्यायालयाने ही घटना एक सुनियोजित कट असून सर्व सहा मुख्य आरोपींना अपहरण, गुन्हेगारी कट, सामूहिक बलात्कार, चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवणे आणि आणि आयटी कायद्यांतर्गत आरोप सिद्ध झाल्याचे सांगितले.

सुनाविनीत काय घडलं?

न्यायाधीश हनी एम. वर्गीस यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की सरकारी वकिलांचे पुरावे मुख्य आरोपीपुरते मर्यादित होते आणि दिलीपचा सहभाग सिद्ध होऊ शकला नाही असे त्यांनी आदेशात म्हंटले आहे. हे प्रकरण हाय-प्रोफाइल होता. त्यामुळे यात २०० हून अधिक साक्षीदार यात सहभागी होते. या प्रकरणात फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक मोठ्या नावांच्या साक्षींचा समावेश होता. अनेक तपास अधिकारी व तपास पथक बदलण्यात आले, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची देखील फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. जामीन रद्द करण्याच्या प्रयत्नांमुळेही हा खटला चर्चेत राहिला.

अभिनेता दिलीपवर कोणते आरोप?

मल्याळम इंडस्ट्रीतील सुपरस्टार दिलीपला तपास यंत्रणेने या प्रकरणात आठवा आरोपी म्हंटले होते. पल्सर सुनी टोळीसोबत या गुन्ह्याचा कट रचल्याचा आणि नंतर पुरावे लपवण्याचा आणि तपासादरम्यान साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असे आरोप करण्यात आले होते. एवढेच नाही तर त्याच्यावर जामीन अटींचे उल्लंघन केल्याचाही आरोप होता. दरम्यान, वर्षानुवर्षे साक्ष, उलटतपासणी आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने दिलीपविरुद्ध पुरेसे पुरावे नाही असे निकष काढत त्याला निर्दोष सोडले.

सहा आरोपींवर आरोप सिद्ध

दिलीपला न्यायालयाने क्लीन चिट दिली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपीसह ६ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १२० ब (गुन्हेगारी कट) , भारतीय दंड संहितेच्या कलम ३४२ (बेकायदेशीरपणे बंदिस्तात ठेवणे), ३५४ आणि ३५४ ब (विनम्रता आणि कपडे उतरवण्याचा प्रयत्न), ३६६ (अपहरण), भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ ड (सामूहिक बलात्कार) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (आयटी कायदा) कलम ६७ आणि ६७ अ अंतर्गत अश्लील साहित्य तयार करणे आणि प्रसारित करणे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिलीपला निर्दोष का ठरवले?

    Ans: तपास आणि साक्षींमध्ये त्याचा सहभाग सिद्ध करणारे पुरावे अपुरे असल्याने.

  • Que: मुख्य प्रकरण काय होते?

    Ans: अभिनेत्रीचे अपहरण करून चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार आणि त्याचा व्हिडीओ रेकॉर्डिंग.

  • Que: कोण दोषी ठरले?

    Ans: मुख्य आरोपी पल्सर सुनीसह ६ जणांना IPC व आयटी कायद्यांतर्गत आरोप सिद्ध.

Web Title: Malayalam actor dileep acquitted in rape case six accused convicted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी निलंबीत
1

Goa Nightclub Fire प्रकरणी मोठी कारवाई, रेस्टॉरंटला परवानगी देण्याची भूमिका घेतल्याबद्दल 3 वरिष्ठ अधिकारी निलंबीत

Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू
2

Nashik Accident: दुःखद! सप्तश्रृंगी घाटात इनोव्हा 600 फूट खोल दरीत कोसळली; 6 भाविकांचा मृत्यू

Palghar Crime: रक्षकच भक्षक! हवालदारानेच केले महिलेवर लैंगिक अत्याचार; चौकशीसाठी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि…
3

Palghar Crime: रक्षकच भक्षक! हवालदारानेच केले महिलेवर लैंगिक अत्याचार; चौकशीसाठी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि…

Chhattisgarh Crime: दिवाणजीचे अपहरण, मदतीला गेलेल्या कंत्राटदाराची नक्षलवाद्यांकडून गळा चिरून हत्या
4

Chhattisgarh Crime: दिवाणजीचे अपहरण, मदतीला गेलेल्या कंत्राटदाराची नक्षलवाद्यांकडून गळा चिरून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.