Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजी कच्ची राहिल्याने पती संतापला; पत्नीला बेदम मारहाण केली अन् नंतर पत्नीनेच आयुष्य संपवलं

वाद वाढत जाऊन पतीने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पत्नीने विषप्राशन केले. घटनेनंतर तिला तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2026 | 08:09 AM
भाजी कच्ची राहिल्याने पती संतापला; पत्नीला बेदम मारहाण केली अन् नंतर पत्नीनेच आयुष्य संपवलं

भाजी कच्ची राहिल्याने पती संतापला; पत्नीला बेदम मारहाण केली अन् नंतर पत्नीनेच आयुष्य संपवलं

Follow Us
Follow Us:

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता केवळ भाजी कच्ची राहिल्याच्या कारणावरून पतीने संतापाच्या भरात पत्नीला बेदम मारहाण केली. याच कौटुंबिक वादातून एका विवाहितेने विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील बोरगाव दाभडी येथे घडली.

चेतना मनोज जाधव (वय ३०, रा. बोरगाव दाभाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे, तर मनोज नामदेव जाधव (वय ३८) असे आरोपी पतीचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी पत्नी व तिचा पतीत भाजी कच्ची राहिल्याच्या कारणावरून वाद झाला. वाद वाढत जाऊन पतीने पत्नीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पत्नीने विषप्राशन केले. घटनेनंतर तिला तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

ब्रेकअप झाल्याने फार्मसीची विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

दरम्यान, या प्रकरणी मृत महिलेचे मामा मनोहर गणू राठोड यांनी आर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले आहेत. तपास ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पल्लवी निळगुळकर करत आहे.

पतीनेच पत्नीला विष पाजले?

पतीनेच पत्नीला बेदम मारहाण केली होती. मारहाण करून विष पाजल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

ब्रेक झाल्याने तरुणीची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, चंद्रपुरातील एका तरुणीने ब्रेकअप झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे ही घटना घडली. आस्था कुंदन नगराळे (वय २१, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आस्था ही तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने राहत होती. ८ एप्रिलला रात्री १०.३० च्या सुमारास ती घरच्यांचे फोन उचलत नसल्याने आईने नागपूरला असलेल्या नातेवाईकांना कळवले. तिचे चुलत भाऊ प्रणय नगराळे यांनी तातडीने सातगाव गाठले असता आस्थाने रूममधील सीलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचे दृश्य समोर आले.

Web Title: Married woman commits suicide by consuming poison in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • Suicide case
  • yavatmal news

संबंधित बातम्या

Yavatmal News: अवैध प्रवासी वाहनांचा बसस्थानकाला विळखा! परिवहन महामंडळ, पोलिस विभाग करणार संयुक्त कारवाई
1

Yavatmal News: अवैध प्रवासी वाहनांचा बसस्थानकाला विळखा! परिवहन महामंडळ, पोलिस विभाग करणार संयुक्त कारवाई

आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न…
2

आणखी एक हुंडाबळी! सासरच्या घरात मृतावस्थेत आढळळी सोशल मिडिया इन्फ्लुएंसर, दिड वर्षांआधी झालं होतं लग्न…

‘सॉरी मम्मी-पप्पा, पुन्हा परीक्षेची हिंमत नाही’; आणखी एका NEET विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
3

‘सॉरी मम्मी-पप्पा, पुन्हा परीक्षेची हिंमत नाही’; आणखी एका NEET विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.