धक्कादायक ! 14 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; मोबाईल काढून घेतला म्हणून राग आला अन्... (फोटो सौजन्य - X)
अकोला : जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील सोनटक्के प्लॉट येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेने गुरुवारी (दि. 29) तिच्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील लोकांच्या मदतीने कुटुंबीयांनी मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेला. मिळालेल्या माहितीनुसार, राणी परवीन (वय 19) या विवाहित महिलेने घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती व सासूला अटक केली आहे.
मृत महिलेचा पती बांधकाम गवंडी आहे आणि घटनेच्या वेळी तो काही कामासाठी बाहेर गेला होता. पती घरी आला तेव्हा त्याची पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेत होती. इर्शाद खान असे महिलेच्या पतीचे नाव आहे. इर्शादचे राणी परवीनशी चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून सासू आणि सुनेमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. राणी परवीनचे माहेरघर त्याच परिसरात होते. काही दिवसांपूर्वी सासूशी झालेल्या वादामुळे ती तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली होती. पण, तिच्या पतीने तिला समजावले आणि काही दिवसांपूर्वी तिला घरी आणले.
हेदेखील वाचा : Sucide News : पुण्यातील धनकवडीत गळफास लावून महिलेची आत्महत्या; कारण…
दरम्यान, गुरुवारी दुपारी पती कामासाठी बाहेर गेला असताना त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर कुटुंबाने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला सर्वोपचार रुग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेला मृत घोषित केले. त्यानंतर महिलेच्या माहेरचे लोकही तिथे आले. त्यांनी तिच्या सासरच्या लोकांवर आरोप केले आहेत.
पुण्यात आणखी एका विवाहितेचा छळ
हडपसर भागात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सलग दुसरा प्रकार या भागात घडला असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून पती, सासू, सासरे, दीरासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : नाशकात भरतो भूत-प्रेतांचा दरबार! कुणी किंचाळतं तर कुणी मुंडक्या फिरवतं; Viral Video पाहून फुटेल घाम