सौजन्य फोटो - AI Gemini
मृत आशा खराट या पती कृष्णा पांडुरंग खराट (३२), सासरे पांडुरंग खराट (७०) आणि मुलांसह घणसोली सेक्टर ४ येथील साईराज सोसायटीत वास्तव्यास होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणांवरून पती आणि सासरे त्यांचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून आशा यांनी १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही बाब कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पाच दिवस अथक प्रयत्न करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर ६ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत विवाहितेचा भाऊ सुरेश कचरे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Ans: ही घटना नवी मुंबईतील घणसोली सेक्टर ४ येथील साईराज सोसायटीत घडली.
Ans: मृत विवाहितेचे नाव आशा कृष्णा खराट (वय २८ वर्षे) असे आहे.
Ans: पोलिसांनी मृत आशा खराट यांचे पती कृष्णा पांडुरंग खराट आणि सासरे पांडुरंग खराट यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.






