पत्नीची आत्महत्या, पतीवर गुन्हा दाखल
हिंगोली : वसमत पोलिस ठाण्यांतर्गत एका भागातील मुलीस ‘माझ्यासोबत लग्न कर. अन्यथा आत्महत्या करेन’, अशी धमकी देणाऱ्या अंबाजोगाई येथील तरुणावर वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत पोलिस ठाण्यांतर्गत एका भागातील मुलीने मैत्रिणीचा मोबाईल समजून एका मोबाईलवर चॅटिंग केली. त्यानंतर सदर मोबाईल एका तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाल्याने त्या मुलीने बोलणेच बंद केले. अधिक चौकशीमध्ये सदर मोबाईल अंबाजोगाई येथील गोविंद कांबळे नावाच्या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, मागील काही दिवसांपासून तो वसमत येथील मुलीस वारंवार मोबाईलवर बोलून त्रास देऊन लागला होता.
गोविंद याने त्या ‘मुलीस तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर मी हात कापून घेतो किंवा आत्महत्या करतो. अन्यथा तुला खतम करतो’ अशी धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सदर प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर गोविंद याने मुलीच्या आईला देखील तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लाऊन द्या. अन्यथा मी मरतो अशी धमकी दिली. या प्रकारानंतर त्या मुलीचे संपूर्ण कुटुंब बुधवारी सायंकाळी वमसत पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.
यावरून पोलिसांनी गोविंद कांबळे याच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, जमादार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
छेडछाडीमुळे कंटाळलेल्या एका तरुणीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा भागात ही घटना घडली असून, तरुणीला त्रास देऊन तिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.