Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 12, 2026 | 06:30 PM
पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरात सापळा रचून पकडले

पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; 'या' परिसरात सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली आहे. सिद्धार्थ अनिल बोराडे (वय २०, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

ही कारवाई शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, पोलिस अंमलदार दिपक चव्हाण, सचिन जाधव, प्रमोद मोहिते व त्यांच्या पथकाने केली आहे.

पुणे शहरातील वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासोबतच बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याविरोधात पोलिसांनी विशेष मोहिम राबवली आहे. यादरम्यान, शिवाजीनगर पोलिस हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अंमलदार दिपक चव्हाण तसेच सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एकजन शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानूसार, पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल जप्त केले. तसेच, त्याच्याकडून दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत. अधिक तपासात सिद्धार्थ याच्यावर यापुर्वीही बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी शिवाजीनगर तसेच तळेगाव दाभाडे याठिकाणी गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! दरोड्याचा कट उधळला; पळून आलेल्या मुलाची सुटका

गोळीबार करणाऱ्या ‘त्या’ दोघांच्या आवळल्या मुसक्या

हवेत गोळीबार केल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी वखार महामंडळाजवळ तरुणावर गोळीबार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली असून, त्यांना नांदेडसिटी परिसरातून पकडले आहे. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल तसेच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. साहिल महेंद्रसिंग चव्हाण व बालाजी रामजी उमाप (रा. स्वारगेट) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या गोळीबारात मोजेश शेखापुरे हा तरुण जखमी झाला होता. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे व अंमलदार पोलिस हवालदार दयानंद तेलंगे, पोलिस अमलदार मयूर भोकरे, अमर पवार, राजेंद्र लांडगे, रणजीत फडतरे, रहीम शेख यांनी केली आहे.

Web Title: Pune police has arrested a criminal who was carrying a pistol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

लग्न कर नाहीतर…, तिने लग्नाला नकार दिला, बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा गळा आवळत मृतदेहाला जिवंत जाळले; मध्य प्रदेशातील घटना
1

लग्न कर नाहीतर…, तिने लग्नाला नकार दिला, बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा गळा आवळत मृतदेहाला जिवंत जाळले; मध्य प्रदेशातील घटना

Baramati News: बारामती पोलिसांचा धडाका! ११ लाखांच्या बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटचा साठा जप्त; मुंबई कनेक्शन उघड
2

Baramati News: बारामती पोलिसांचा धडाका! ११ लाखांच्या बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटचा साठा जप्त; मुंबई कनेक्शन उघड

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई
3

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime : अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

Pune Crime : अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.