'या' खासगी कंपनीकडून गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक, जादा परताव्याचे आमिष दाखवून घातला गंडा
भाईंदर/ प्रतिनिधी विजय काते : मिरा भाईंदरमध्ये एका खाजगी कंपनीने गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आमीष दाखवत लाखो रुपये लुटल्यातचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदेव पार्क परिसरात टोरेस नावाची आर्टिफिशल डायमंड विक्री करणारी कंपनी नागरिकांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे हजारो गुंतवणूकदारांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे.कंपनीने केले आकर्षक परताव्याचे आमिष टोरेस कंपनीने लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची ऑफर दिली होती. लोकांना सांगण्यात आले की, त्यांच्या गुंतवणुकीवर आठवड्याला ठराविक टक्केवारीने रक्कम खात्यात जमा होईल. अनेकांना यामुळे लवकर फायदा होईल असे वाटल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले.
आज सकाळी कंपनीचे दादर येथील मुख्य कार्यालय आणि मिरा भाईंदर येथील शोरूम अचानक बंद झाल्याचे समोर आले. ही माहिती पसरताच आपल्या गुंतवणुकीची चौकशी करण्यासाठी लोकांनी शोरूमसमोर मोठी गर्दी केली. मात्र, शोरूम बंद असल्याने नागरिकांमध्ये गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.मिरा भाईंदर परिसरातील सुमारे 1 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनीत गुंतवणूक केली होती. अनेकांनी आपले आयुष्यभराची जमापुंजी या योजनांमध्ये गुंतवली होती. कंपनीच्या फसवणुकीमुळे या सर्व गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.फसवणुकीची बाब लक्षात येताच लोकांनी आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली. शोरूमबाहेर काहींनी निदर्शने केली, तर काहींनी पोलिसांत तक्रारी केल्या.
Breaking : मुंबईत पुन्हा दहशतीचे षडयंत्र? ताज हॉटेलबाहेर एकाच नंबरच्या दोन गाड्या; नेमकं काय प्रकरण?
नागरिकांनी या प्रकारामुळे आपण कसे फसवले गेलो याबद्दल आपली हतबलता व्यक्त केली.मिरा भाईंदर पोलिसांनी याबाबत गुंतवणूकदारांकडून तक्रारी स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक चौकशीत कंपनीने मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून कंपनीच्या मालक आणि संचालकांची माहिती गोळा करण्यात येत आहे.या फसवणुकीमुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत. लोकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी, निवृत्तीचे पैसे आणि उधारीचे पैसे या कंपनीत गुंतवले होते. आता या प्रकरणामुळे आर्थिक नुकसान झालेल्या नागरिकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.लोकांनी पोलिसांकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, कंपनीच्या मालमत्तेचा शोध घेऊन गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.नागरिकांनी फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन या घटनेमुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत आणि विश्वासार्ह संस्थांमध्येच गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.