Photo Credit- Team Navrashtra खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका
मुंबई: बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस पहिल्या दिवसापासून मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत आहेत. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला अटक कऱण्यात आली. यानंतर या प्रकरणाचा सीआयडी तपास अद्यापही सुरूच आहे. पण अटकेनंतही वाल्मिक कराडचे नवनवे प्रताप कारनामे समोर येतच आहेत. बीड आणि परभणीनंतर काल पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडची पोलखोल केली आहे.
गेल्या वर्षी 14 जूनला अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड, नितीन बिक्कड यांची बैठक झाली होती. ही बैठक थेट धनंजय मुंडे यांच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते. पण धनंजय मुंडेची भेट घेण्यासाठी वाल्मिक कराडचा इगो दुखावला गेला. त्यामुळे त्याने प्रशांत जोशी यांना खडसावल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं.
मोक्कातील 801 गुन्हेगारांचा जामीन, भाईगिरीचाही दावा; आरोपींवर पुणे पोलिसांची नजर
सुरेश धस म्हणाले, “त्यानंतर 19 जून रोजी पुन्हा धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर अवादा कंपनी आणि आय एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कराडने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.पण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावर वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्याचे मान्य केले. त्यावर निवडणुकीसाठी कंपनीकडे लगेच 50 लाखांची मागणी करण्यात आली. कंपनीने त्यांना 50 लाख रूपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेकडे देण्यात आले होते. पण वाल्मिक कराडने मात्र आपल्याला हे माहिती नसल्याचे सांगितले.
याचवेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडची 100 बँक खाती असल्याचाही दावा केला. तसेच त्याची चौकशी का केली जात नाही. असा सवालही उपस्थित केला. इतर कोणाची 50 बँक खाती असतील तर ईडी लगेच मागे लागले. असा चिमटाही त्यांनी काढला. तसेच, वाल्मिक कराड आणि त्याचा सहकारी नितीन कुलकर्णी यांच्या दोघांकडे मिळून तब्बल 17 मोबाईल नंबर असल्याचा गौप्यस्फोटही केला. वाल्मिक कराड शरण आला पण त्यानंतर नितीन कुलकर्णीही फरार आहे. आता नितीन कुलकर्णींनाही लवकरात लवकर ताब्यात घ्यावे, असे आवाहन धस यांनी केलं आहे. कुलकर्णीला अटक केल्यानंतर 17 मोबाईल नंबर तपासल्यानंतर कुणी कुणाकडून किती पैसे घेतले हे समोर येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Crime News: मंचर पोलिसांच्या प्रयत्नांना यश; अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुली 12 तासांत सापडल्या