
crime (फोटो सौजन्य: social media)
मेरठ: ‘पती-पत्नी आणि तो’ त्रिकोणाचा शेवट रक्तरंजित शेवट आपल्याला नेहमी पाहायला मिळत आहे. तीन मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने पतीची भयंकर हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीच्या थेट छातीत गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी पत्नी, तिचा प्रियकर यासह त्याचा सोबती याने हे तिघेही फरार आहेत. ही घटना मेरठमधील परीक्षितगढ पोलीस स्टेशन हद्दीतील अगवानपूर गावात घडली आहे.
नेमकं काय घडलं?
१ नोव्हेंबर रोजी गावाबाहेरील एका शेतात राहुलचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहावर तीन गोळ्यांचे निशाण होते. थेट त्याच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या होता. सुरुवातीला पोलिसांनी लुटमारीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पण तपास सुरु असताच तपासाची दिशा बदलल्यावर वेगळेच रहस्य उलगडले. त्याने पोलीसही हादरून गेले.
पोलीस अधीक्षक ताडा यांच्या नेतृत्वाखाली पथकाला राहुलच्या हत्येमागे अवैध संबंधांचा संशय आला होता. या संशयावरून पोलिसांनी राहुलची पत्नी अंजली हिची चौकशी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याच वेळी अंजली घरातून अचानक फरार झाली. तिचा प्रियकर अजय हा देखील त्याच गावातील होता. तो देखील गायब झाल्याचे पोलिसांना कळाले. या घटनेने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यांनी या दोघांनाही शोधण्याचा निर्णय घेतला.
पत्नीची चौकशी सुरू होताच ती झाली फरार
पोलीस अधीक्षक विपिन ताडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाला राहुलच्या हत्येमागे अवैध संबंधांचा संशय आला. या संशयावरून पोलिसांनी राहुलची पत्नी अंजली हिची चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याचवेळी अंजली घरातून अचानक फरार झाली. तिचा प्रियकर अजय जो त्याच गावातील होता. तो देखील गायब झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या घटनेने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यांनी या दोघांनाही शोधण्याचा निर्णय घेतला.
का केली हत्या?
पोलिसांनी काही काळानंतर अंजली आणि अजय या दोघांनाही अटक केली. चौकशी केल्यावर अजयने संपूर्ण कट उघड केला आहे. अंजली आणि त्याचे असलेले अनैतिक संबंध राहुलला कळाले होते. याच कारणामुळे संतप्त झालेल्या अंजलीने पतीला कायमचे रस्त्यातून हटवण्याचा कट रचला. त्यानुसार, अजयने राहुलला घरी बोलावून त्याच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याचा मृतदेह झुडपात फेकून दिला. पतीच्या मृत्यूनंतर अंजलीने केलेले रडणे- ओरडणे केवळ एक ढोंग होते. हे प्रकरण समोर येताच सर्वांना धक्काच बसला.
सौरभ हत्याकांड
काही दिवसांपूर्वी मेरठ शहरात मुस्कानने प्रियकरासोबत मिळून पतीला तुकड्यांमध्ये कापून सिमेंटच्या ड्रममध्ये टाकले होते. ही घटना अद्याप कोणी विसरू शकला नाही आहे. आणि आत अशीच घटना पुन्हा मेरठ मध्ये झाल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीची वातावरण आहे.
Pune Land Scam Sheetal Tejawani: 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी परदेशात फरार? पोलिसांकडून शोध सुरू
Ans: मेरठ
Ans: अंजली
Ans: अजय