Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत मध्यरात्री राडा; रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी

सुरुवातीला ओमकार क्षीरसागर याला रॉड व विटांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2026 | 08:45 AM
खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत मध्यरात्री राडा; रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी

खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत मध्यरात्री राडा; रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी येथे सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास थरारक हल्ल्याची घटना घडली. गरुडा गँगशी संबंधित असल्याची ओळख असलेल्या ओमकार क्षीरसागर याच्यावर प्रथम रॉड आणि विटांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर हल्लेखोरांनी सलग तीन राऊंड गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी ओमकार क्षीरसागर याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात संशयित म्हणून साई गोलांडे, ओमकार माने, राकेश महतो आणि बाबू शेटे यांची नावे समोर आली आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे परिसरातील वर्चस्वाचा वाद किंवा कथित वेश्याव्यवसायाला विरोध हे कारण असावे, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.

Uttarpradesh Crime : संतापजनक ! शेजाऱ्यांना फसवण्यासाठी बापानेच दीड वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून केला खून

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुरुवातीला ओमकार क्षीरसागर याला रॉड व विटांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली, तर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकाबंदी केली. घटनास्थळाच्या पंचनाम्यात पिस्तुलाचे एक मॅगझिन तसेच गोळीबारात वापरण्यात आलेल्या काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन आवश्यक वैज्ञानिक पुरावे संकलित केले असून तपासासाठी ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच आरोपींना अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे शिंदेवाडीसह संपूर्ण खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Midnight riot in shindewadi khandala taluka one youth injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • khandala news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.