Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: अकोल्यात मिरवणुकीत औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक; 8 ते 10 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल

अकोला शहरातील बियाणी चौक परिसरात ९ सप्टेंबर २०२५ रोजी ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी एका वादग्रस्त प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 13, 2025 | 01:00 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

अकोला शहरातील बियाणी चौक परिसरात ९ सप्टेंबर २०२५ रोजी ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी एका वादग्रस्त प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मिरवणुकीत ८ – १० अनोळखी इसमांनी औरंजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक केल्याचे समोर आले आहे. याचा एक व्हिडीओ १२ सप्टेंबर रोजी सोहस्ल मीडियावर व्हायरल झाला असून त्या ८ – १० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईडी कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा

गुन्हा दाखल 

या प्रकारामुळे जिल्हाधिकारी यांच्याद्वारे दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झाले असून, हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे पो.ह.वा. आशिष अशोक सुगंधी यांनी आपल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे शहरातील शांतता व धार्मिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही घटना ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बियाणी चौकातील नटराज व कन्हैया ड्रेसेससमोर घडली होती. या तक्रारीवरून अज्ञात आठ ते दहा इसमांविरोधात गुन्हा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला रजि. नं. 258/25, भारतीय दंड संहिता 196 व BNS च्या कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींचा शोध सुरु

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले करत असून, दाखला अधिकारी म्हणून हेड कॉन्स्टेबल सोपान डाबेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी सदर व्हिडीओ व पुरावे तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. शहरातील शांतता कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अकोल्यात सासरवाडीतच जावयाचा धारदार शस्त्राने खून; कौटुंबिक वादातून हत्या

दरम्यान, जावयाचा धारदार शास्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. हत्या त्यांच्या सासरवाडीत झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण आहे. ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात बुधवारी संध्याकाळी 6:00 वाजता घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव पायरुजी गोपनारायण (वय 40, रा. कानशिवनी, ता. अकोला) असे आहे.

Solapur News : हृदयद्रावक! अपघातात नातवाचा मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी आजीला हृदयविकाराचा झटका; दोघांचेही एकाचवेळी अंत्यसंस्कार

 

 

Web Title: Milk anointment on aurangzebs poster during a procession in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.