पुणे: कोथरूड भागात ज्येष्ठ दाम्पत्याचा फ्लॅट फोडून साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरुन पसार झालेल्या अल्पवयीनांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन सराइत गुन्हेगार आहे. कोथरूड भागातील हॅप्पी कॉलनीत एका सोसायटीत ज्येष्ठ दाम्पत्य राहायला आहे. ७ मार्च रोजी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अल्पवयींनांनी कपाटातील साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास पथकाने कोथरूड परिसरातील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अल्पवयीनांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले. चौकशीत एका अल्पवयीनाच्या भावाकडे उर्वरित दागिने असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हडपसर भागातून पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दागिने जप्त केले. पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांचे दागिने जप्त केले. दाखल गुन्ह्यात चोरीला गेलेल्या १४४ ग्रॅम दागिन्यांपैकी ११८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
दुचाकीस्वार महिलेचे मंगळसूत्र चोरीला
सिंहगड रस्त्यावरील धायरीत दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यावर नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ३५ वर्षीय महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धायरी भागात राहायला आहेत. त्या सोमवारी (२४ मार्च) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास धायरी परिसरातून दुचाकीवरुन निघाल्या होत्या दुचाकीस्वार चोरटा त्यांच्या मागावर होता.
दौंडमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यातच आढळले अर्भकांचे अवयव; परिसरात एकच खळबळ
समर्थ फ्लोअर मिलजवळ दुचाकीस्वार महिलेने वेग कमी केला. दुचाकीस्वार चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटा भरधाव वेगात पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्याचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे तपास करत आहेत.
अधिकाऱ्यांना 5 लाखांची लाच स्वीकारणं भोवलं
सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार व बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपीकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली आहे.