एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील आंध्रड येथील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेत शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी डोणगाव पोलिसांनी दोन मुलांच्या बापाला अटक केली असून, त्या आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेदेखील वाचा : Crime News: ‘माझ्या अंगात देव येतो’ असे सांगून महिलेवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल
आंध्रड येथील एका 17 वर्षीय मुलीला आरोपी अमोल विजय लोखंडे (रा. नावली, ता. रिसोड, जि. वाशीम) याने 7 डिसेंबरला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर नाशिक येथे सदर मुलीच्या मनाविरुद्ध आरोपीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत मुलीच्या आईने डोणगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली असता आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप सावळे व कर्मचाऱ्यांचे पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.
अल्पवयीन मुलगी व आरोपी हे शिरपूर पोलिस स्टेशनला मंगळवारी (दि. 31) आल्याचे समजताच पोलिस निरीक्षक सावळे व पथकाने आरोपी व अल्पवयीन मुलीला डोणगाव पोलिस स्टेशन येथे आणले. चौकशी केली असता सदर मुलीने आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगितले. आरोपीला अटक करून आरोपीविरूद्ध कलम पॉक्सोनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील बिबवेवाडीत अत्याचाराची घटना
‘माझ्या अंगात देव येतो’, असे सांगत महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तक्रारदार यांच्या घरी आला होता. त्याने माझ्या अंगात देव येतो यासह वेगवेगळ्या बतावणी करून महिलेवर प्रभाव पाडला.
राजधानी दिल्लीतही मुलीवर अत्याचार
दिल्लीतील कॉलनीतील एका विद्यार्थ्याने लोणी येथील ताहेरे भागातील अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने (वडिलांच्या मोठ्या भावाचा मुलगा) लैंगिक अत्याचाराचा केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. अत्याचारानंतर विद्यार्थिनीने दिल्लीतील रुग्णालयात मुलाला जन्म दिला. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून अहवाल दाखल केला. घटनास्थळ लोणी येथे असल्याने पीडितेला स्थलांतरित करण्यात आले आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिचे वय निश्चित करून पोलीस पुढील कारवाई करतील.
हेही वाचा: Accident News: दोस्त दोस्त ना रहा! जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी…; पोलिसांकडून गुन्हा दाखल