फोटो- istockphoto
पुणे: माझ्या अंगात देव येतो असे सांगत महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तक्रारदार यांच्या घरी आला होता. त्याने माझ्या अंगात देव येतो यासह वेगवेगळ्या बतावणीकरून महिलेवर प्रभाव पाडला.
नंतर वेगवेगळ्या निमित्ताने घरी येऊन या महिलेचा विश्वास संपादन केला. नंतर वारंवार घरी येऊन तो मुक्कामी राहू लागला. योवळी महिला दोनही मुलांसोबत एकटीच असताना आरोपी तिच्या बेडरूमध्ये गेला. त्याने चाकुचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
अदोगर लग्न झालेले असतना महिलेशी प्रेमसंबंध प्रस्तापित करून तिला लग्न करण्याचे आमिष दाखविले. तिला राहत्या घरी भेटण्यासाठ बोलवून जबरदस्तीने शरिरसंबंध ठेवले. तसेच, त्यांच्यासोबतचे काढलेले फोटो महिलेच्या सासूला पाठविण्याची धमकी दिल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२३ दरम्यान घडला. याबबात ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली.
हेही वाचा: Accident News: दोस्त दोस्त ना रहा! जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी…; पोलिसांकडून गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा
सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २७ वर्षीय तरूणावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या पालकांनी तक्रार दिली आहे. अत्याचारामुळे पिडीता ३ महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरानंतर पॉस्कोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
राज्यात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. बदलापूर कल्याणमधील घटना ताजी असतानाच आता मुरुडमध्ये सात वर्षाच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने रायगड जिल्हा हादरूने गेला आहे. सततच्या या घडणाऱ्य़ा गुन्ह्यांवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्षीय नराधमाने सात वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने मुरुडसह अलिबाग तालुका हादरलं आहे. अद्याप आरोपी फरार असून रायगड पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.मुरुडमध्ये सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराजवळ असलेल्या समुद्रकिनारी नेवून तिच्यावर शाररिक अत्याचार केला आहे.
याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरुड तालुक्यातील एका गावात दिनांक 27 डिसेंबर रोजी पीडित मुलगी ही तिचा भाऊ आणि बहीण यांच्यासोबत शौचास गेली होती. सदर ठिकाणी आरोपी याने येवून पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिचे अज्ञान असण्याचा फायदा घेवून तिला एकटीलाच समुद्र किनारी उभ्या केलेल्या एका बोटीत नेऊन तिच्यावर शारीरीक अत्याचार केला.