Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meera-Bhaindar News: मीरा-भाईंदर महापालिकेत भाजप नगरसेवकांकडून नागरिक अन् पत्रकारांना मारहाण: नेमकं घडलं काय?

Meera-Bhaindar News: भाईंदर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात अधिकृत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि मोबाईल व्हिडिओंची तपासणी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 17, 2026 | 11:24 AM
Mira Bhaindar, MBMC, Bhaindar Police, FIR, BJP,

Mira Bhaindar, MBMC, Bhaindar Police, FIR, BJP,

Follow Us
Follow Us:
  • मीरा-भाईंदर महापालिका महासभेत नागरिक आणि पत्रकारांना मारहाण
  • भाईंदर पोलीस ठाण्यात भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल.
  • प्रेक्षक गॅलरीतील बाचाबाचीवरून वाद विकोपाला आणि मारहाण झाली.
 

Meera-Bhaindar News: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) महासभेत मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकारांना १६ भाजप नगरसेवकांनी मारहाण केल्याच्या आरोपात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महासभेच्या कामकाजादरम्यान सर्वसामान्य नागरिक आणि या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या पत्रकारांना भाजप नगरसेवकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महासभेचे कामकाज सुरू होते. त्यावेळी अचानक प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या सर्वसामान्य नागरिक आणि नगरसेवकांमध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली. काही क्षणातच हा वाद चांगलाच विकोपाला गेला त्यामुळे नगरसेवकांनी थेट सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

IND vs WI: 4 सामन्यांपासून बाहेर Vaibhav Sooryavanshi, इन्स्टाग्रामवर दोन शब्दात भावना व्यक्त; चर्चेला उधाण

भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात अधिकृत गुन्हा दाखल

या घटनेचे व्हिडिओ काढत असलेल्या उपस्थित पत्रकारांवरही धावून जात त्यांना मारहाण करण्याचा आणि त्यांचे फोन हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पत्रकारांकडून करण्यात आला आहे.

भाईंदर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात अधिकृत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि मोबाईल व्हिडिओंची तपासणी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना आणि पत्रकारांना मारहाण करण्याऱ्या सर्व दोषींवर दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

End Poverty: केवळ आर्थिक विवंचना नव्हे, तर सन्मानाने जगण्याच्या हक्काचा लढा; जाणून घ्या ‘या’ दिवसाचे महत्त्व

नेमकं घडलं काय?

महानगरपालिकेच्या महासभेचे कामकाज सुरु होते. पण त्याचवेळी अचानक प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या काही नागरिकांचा आणि भाजपच्या नगरसेवकांचा वाद झाला. अवघ्या काही क्षणातच हा वाद चांगचाल पेटल्याने सभागृहात तणावाचे वातावरण बनले होते. याचवेळी नगरसेवकांनी काही नागरिकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. असा आरोप करण्यात आला. या संपूर्ण मारहाणीचा पत्रकारांनी व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी नगरसेवकांना पत्रकारांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी उपस्थित पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. पण नागरिक आणि पत्रकारांनी मात्र या घटनेच्या निषेधार्थ महानगरपालिकेच्या तळमजल्याजवळच ठिय्या आंदोलन सुरू केले. गेल्या काही महिन्यांमध्ये नगरसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांना मारहाण होत असल्याच्या काही घटना सासत्याने समोर येत आहेत. या घटनेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

Web Title: Mira bhaindar corporation ruckus fir against 16 bjp corporators for assault

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • mira bhaindar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.