Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander News : “10 मिनिटांत डिलीव्हरी” देणं बेतलं जीवावर! तरुण डिलीव्हरी कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार कोण?

10 मिनिटांत डिलीव्हरी ही ग्राहकांसाठी जरी सुविधा असली तरी डिल्हिवरी करणाऱ्या डिल्हिवरी बॉयसाठी हा मृत्यूचा सापळा होत असल्याचं दिसून येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 22, 2025 | 02:28 PM
Mira Bhayander News : “10 मिनिटांत डिलीव्हरी” देणं बेतलं जीवावर! तरुण डिलीव्हरी कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार कोण?
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर /विजय काते: आजच्या डिजिटल युगात ग्राहकांना सर्वकाही घरबसल्या, तेही काही मिनिटांत मिळावे, ही मागणी वाढत चालली आहे. या मागणीवर झेप्टो, ब्लिंकीट यांसारख्या डिलीव्हरी कंपन्यांनी “10 मिनिटांत डिलीव्हरी” हा नवा फंडा राबवला. परंतु ग्राहकांचे समाधान आणि बाजारपेठेतील वर्चस्व मिळविण्याच्या या शर्यतीत सर्वात मोठा बळी ठरत आहेत ते म्हणजे या कंपन्यांमध्ये काम करणारे डिलीव्हरी बॉय.

काल अशाच एका दुर्घटनेत तरुण डिलीव्हरी कर्मचाऱ्याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना हा अपघात घडला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: तू तक्रार केलीस तर तुला बघून घेतो…; मेकअप आर्टिस्टवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला

दबावाखाली धावणारे कामगार

डिलीव्हरी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेत जास्तीत जास्त डिलीव्हरी करण्याचा दबाव आणतात. पगाराचे गणितही डिलिव्हरी संख्येवर अवलंबून असते. परिणामी कामगार जीव धोक्यात घालून रस्त्यावर वाहनं चालवतात.

विरुद्ध दिशेने जाणे, वेगाने ओव्हरटेक करणे,वाहतूक नियमांचे उल्लंघन हे प्रकार रोजच्याच झाले आहेत. ग्राहकांना १० मिनिटांत ऑर्डर मिळावी म्हणून डिलीव्हरी बॉय स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर धाव घेतात.

कंपन्यांचे व्यावसायिक मॉडेल की मृत्यूचे कारण?

तज्ज्ञांच्या मते, “10 मिनिटांत डिलीव्हरी” हे मॉडेल सुरक्षित वाहतूक आणि रस्त्यांवरील वास्तव लक्षात घेता अशक्य आहे.
डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांच्याकडे उपलब्ध साधनं अपुरी आहेत.अपघात झाल्यास कंपनी जबाबदारी झटकते.विमा, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षिततेबाबत स्पष्ट धोरण नाही.

ग्राहकांची भूमिकाही महत्त्वाची

ग्राहकांना “सर्वकाही लगेच हवे” या मानसिकतेमुळेच या कंपन्यांना असे मॉडेल राबवण्याचा धाडस मिळाले आहे. ग्राहकांनीही संयम दाखवून डिलिव्हरी कामगारांच्या जीविताचा विचार करणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.

सरकार आणि प्रशासन कुठे?

रोज वाढणारे अपघात, मृत्यू आणि वाहतुकीची तोडफोड पाहता सरकार आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.डिलीव्हरी कंपन्यांवर कठोर नियम घालावेत. त्याचबरोबर 10 मिनिटांच्या डिलीव्हरीची अट रद्द करण्यात यावी याबाबत मागणी केली जात आहे.

कर्मचाऱ्यांना विमा आणि सुरक्षितता हमी द्यावी

ग्राहकांच्या समाधानाच्या नावाखाली तरुणांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या या व्यावसायिक स्पर्धेवर आता तरी लगाम बसायला हवा. अन्यथा “१० मिनिटांची डिलीव्हरी” ही सुविधा नाही तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा सापळा म्हणून ओळखलं जाईल.

ग्राहकांना घरबसल्या झटपट वस्तू पुरविण्याच्या शर्यतीत झेप्टो आणि ब्लिंकीटसारख्या मोठ्या डिलीव्हरी कंपन्यांनी निर्माण केलेल्या दबावामुळे डिलीव्हरी बॉयंचा जीव धोक्यात येऊ लागला आहे. ग्राहकांना केवळ 10  मिनिटांत वस्तू पोहोचविण्याची हमी पाळण्यासाठी या कंपन्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घालून रस्त्यावर वेगाने वाहन चालवत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते.

या तीव्र स्पर्धेत काल आणखी एक बळी गेला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका डिलीव्हरी कर्मचाऱ्याला डंपरने चिरडले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनीही अशा धोकादायक स्पर्धात्मक धोरणांवर संताप व्यक्त केला आहे.

डिलीव्हरी कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे गणित त्यांच्या कामगिरीवर म्हणजेच किती डिलिव्हरी पूर्ण केल्या यावर ठेवतात. त्यामुळे कामगार वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, ओव्हरटेक, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा जीवघेण्या पद्धतीने धाव घेतात. परिणामी रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत असून अनेक तरुणांचा जीव धोक्यात येत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. मात्र या घटनेनंतर डिलीव्हरी कंपन्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्राहकांना खुश करण्याच्या या शर्यतीत कामगारांचा जीवच धोक्यात घालणारे हे मॉडेल बदलले नाही तर अशा प्रकारच्या दुर्घटना पुढेही घडत राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Mumbai Crime: भिवंडीतून फिलिस्तीनला पैसे पाठवण्याचा संशय; एटीएसकडून तीन संशयित दहशतवादी ताब्यात

Web Title: Mira bhayander news delivery in 10 minutes is a life threatening task who is responsible for the death of a young delivery worker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Accident Case
  • Marathi News
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी
1

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप
2

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला
3

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

KDMC News : कल्याणकर पाणी जपून वापरा ! पुढचे 12 तास शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद
4

KDMC News : कल्याणकर पाणी जपून वापरा ! पुढचे 12 तास शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.