
अहिल्यानगर शहरात ई कचरा निर्मूलन अभियान,
अहिल्यानगर शहराचा सर्वांगीण विकास आणि स्वच्छतेसाठी आ. संग्राम जगताप तसेच महापालिका आयुक्त यशवंत डांगे स्वतः रस्त्यावर उतरून काम करत आहेत. मात्र, शहरातील रस्त्यांवरील कचऱ्यासोबतच ई-कचऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. जसा सामान्य कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावली जाते, तशीच ई-कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर Vichar Bharati Sanstha यांच्या पुढाकारातून Ahilyanagar Municipal Corporation यांच्या सहकार्याने विशेष ई-कचरा संकलन अभियान राबविण्यात येत आहे.
23 फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त प्रोफेसर चौक येथे या अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात येणार आहे. शहरातील नागरिक, सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर ज्योती गाडे यांनी केले आहे.
या अभियानाच्या नियोजनासाठी महापालिकेत विशेष बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर धनंजय जाधव, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, विचार भारतीचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, मार्गदर्शक रवींद्र मुळे, विविध नगरसेवक तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ई-कचरा संकलनासाठी प्रोफेसर चौक, यशोदानगर, अप्पू चौक, माळीवाडा वेस, बुरुडगाव प्रभाग समिती कार्यालय, केडगाव उपकार्यालय, दिल्लीगेट आणि डाळ मंडई येथे तात्पुरती केंद्रे उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनी घरातील बंद पडलेली किंवा अडगळीत पडून असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे या केंद्रांवर जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
रवींद्र मुळे यांनी सांगितले की, शहराचे नाव बदलल्याप्रमाणेच अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याला साजेसे आदर्श शहर उभारणे आवश्यक आहे. हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धीप्रमाणे अहिल्यानगरही पुढील पाच वर्षांत आदर्श शहर बनावे, यासाठी विचार भारतीने सहा महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या आहेत.
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद विजयाचा जल्लोष; दिलीपराव देशमुखांच्या हस्ते सत्कार